कृषीदूत श्रीराम पाटील यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना माती परिक्षणाविषयी दिली माहिती

अकलूज (बारामती झटका)

अलीकडील काळात जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येत आहे. म्हणून जमिनीच्या आरोग्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. यालाच अनुसरून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज संचलित ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२ चे आयोजन अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी. कोरटकर, प्राचार्य आर. जी. नलवडे, प्रा. एस. एम. एकतपुरे प्रा. एस. आर. आडत. प्रा. डी.एस. मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत श्रीराम पाटील यांनी पिंपरी (पा.) ता. बार्शी येथील शेतकऱ्यांना माती परिक्षणाविषयी माहिती दिली.

जमिनीत पीकवाढीसाठी कोणत्या मातीपरीक्षणाचा मूळ उद्देश हा अन्नद्रव्यांची कमतरता आहे, हे तपासणे व ती भरून काढण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, हे ठरविता यावे यासाठी कृषीदूताकडून ग्रामीण कृषी कायानुभवांतर्गत शेतकऱ्यांना मातीपरीक्षणाविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना मातीचा नमुना कसा घ्यावा, कोणत्या ठिकाणचा घ्यावा, कोणत्या ठिकाणी घेऊ नये, मातीची उत्पादकता सुधारण्यासाठी करायचे उपाय, आवश्यक अन्नघटक व त्याच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणे याविषयी प्रात्यक्षिक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी सदानंद काशीद, सचिन सुतार, दिग्विजय कटमोरे, बबलू पाटील, चिंतामणी काटमोरे आदी शेतकरी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूज येथे ‘खोमणे गुळाचा चहा’ या अमृततुल्यचा उद्घाटन समारंभ संपन्न…
Next articleवाघोलीची १००% लसीकरणाकडे वाटचाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here