तरंगफळ (बारामती झटका)
तरंगफळ ता. माळशिरस येथे आयोजित केलेल्या चर्चासत्रात कृषी सहाय्यक उमेश मोहिते बोलत होते. यावेळी तरंगफळचे कृषी सहाय्यक श्री. नितीन शिंदे यांनी महाडीबीटीच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजना चालू आहेत, त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी एकता शेतकरी गटाने राबविलेल्या गहू प्रकल्पाचे कौतुक करून शेतकऱ्यांच्या गहू पिकाची पाहणी केली व यापुढेही एकता शेतकरी गट व तरंगफळ मधील शेतकरी यांना कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने सहकार्य केले जाईल, असे आश्वासन कृषी सहाय्यक उमेश मोहिते यांनी दिले. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. शांतीलाल तरंगे, प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा रत्नप्रभादेवी मोहिते पाटील अपंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गोरख मारुती जानकर, माजी सरपंच महादेव तरंगे, एकता शेतकरी गटाचे अध्यक्ष सुजित तरंगे, भानुदास जानकर, विलास तरंगे, तुकाराम जानकर, शेतकरी गटाचे सचिव अभिजीत तरंगे, कुणाल काळे, किसन काकडे, भगवान तरंगे, नवनाथ होनमाने, बबन साळवे यांचेसह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

या चर्चासत्रात महाडीबीटी योजना, डाळिंब पिकावरील खोड किडा, जी आय मानांकनसाठी अर्ज भरून घेणे याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व शेतकरी व शासकीय अधिकारी यांचे आभार गोरख जानकर यांनी मानले व सूत्रसंचालन अभिजीत तरंगे यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng