केंद्रीय जलशक्ती मंत्रालय कमिटीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवड…

माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर पाणीदार खासदार जलनायक रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवडीने मतदार संघात मानाचा तुरा रोवला गेला.

माळशिरस (बारामती झटका)

माढा लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार जलनायक खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची आज देशाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत पाणी वाटप पॉलिसी ठरवणाऱ्या कमिटीवर विशेष निमंत्रित सदस्य पदी निवड झाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे.

देशाच्या शेती पाण्याच्या प्रश्नावर विविध धोरणे ठरवणे, यामध्ये नदीजोड प्रकल्प, धरणे, पाण्याचे स्त्रोत्र ठरवणे, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना ठरवणे, जल जीवन मिशन अंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हर घर जल ही योजना राबवणे, दुष्काळी पट्ट्यातील जनतेला शेती पाण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचा अभ्यास करणे, ज्यादा पाऊस झाल्यानंतर वाहून जाणाऱ्या पाण्यावर अभ्यास करून कशा पद्धतीने ते वाहून जाणारे पाणी वापरता येईल यावर अभ्यास करणे, केंद्र व राज्य यांच्यामध्ये समन्वय ठेवून पाण्याची धोरणे ठरवणे, अशा अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे अशा कमिटीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवड केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केली.

याबाबतचे शासन स्तरावरचे सर्व आदेश निघाले आहेत. या निवडीमुळे महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्याला नक्कीच याचा फायदा होईल. माढा लोकसभा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचे व शेती पाण्याचे जे उर्वरित प्रश्न राहिलेले आहेत, ते सुद्धा या निमित्ताने निकाली निघतील. या निवडीमुळे मतदार संघातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसर्वसामान्यांचे प्रश्न सोडवा प्राध्यापक शिवाजीराव सावंत
Next articleअकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांची मंत्रालयात उपसचिव पदावर बढती….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here