केंद्रीय दूरसंचार मंत्री देवुसिंग चौहान यांचा माळशिरस तालुक्यातील भाजपच्या वतीने सन्मान संपन्न.


फलटण ( बारामती झटका )

केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंग चौहान यांचा सन्मान माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे तालुका जिल्हा व राज्य कार्यकारणी सदस्य यांच्यावतीने भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान संपन्न झाला. यावेळी भाजपचे प्रांतिक सदस्य सोलापूर जिल्हा संघटक के. के. पाटील, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, ओबीसीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, माळशिरस शहरातील युवा नेते आकाश सावंत, अमोल वाघमोडे, ॲड. गणेश सिद आदी मान्यवरांसह युवा पत्रकार स्वप्निलकुमार राऊत, संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी उपस्थित होते.

माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून जाधववाडी ता.फलटण येथील शुभारंभ लॉन्स येथे केंद्रीय मंत्रालयातील विविध विभागांचे भव्य प्रदर्शन गेली दोन दिवस सुरु असून त्याचा समारोप केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंग चौहान यांच्या शुभहस्ते व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर अध्यक्षतेखाली संपन्न झाल़ा. सदर कार्यक्रमा निमित्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंग चौहान यांचा सन्मान माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला . बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचा केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंग चौहान व माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सन्मान केला. यावेळी व्यासपीठावर माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, सातारा जिल्हा परिषद मा. सदस्या ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर, फलटणचे माजी नगराध्यक्ष अनुप शहा भाजपचे युवा नेते सुशांत निंबाळकर  आदी मान्यवरांसह सातारा सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleलोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने बार्टीच्या धरतीवर स्वतंत्र संस्था सुरु करावी – आमदार रामभाऊ सातपुते
Next articleहोमिओपॅथिच्या राजाश्रयासाठी प्रयत्नशील राहणार – महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. सोमनाथ गोसावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here