केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकारची शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका – शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी.

बळीराजा हुंकार यात्रेतील शेतकऱ्यांच्या प्रचंड उपस्थितीने तालुक्यात स्वाभिमानी संघटना होणार भाजप, राष्ट्रवादीची दमछाक.

स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुक्यात गतवैभव प्राप्त करण्याचे स्वयंस्फूर्तीने शेतकऱ्यांच्या उपस्थिती व पक्षप्रवेशाने संकेत दिले…

माळशिरस ( बारामती झटका )

केंद्रामधील नरेंद्र मोदी यांचे सरकार व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेच निर्णय घेतलेले नाहीत. शेतीसाठी लागणाऱ्या युरिया खताची प्रचंड महागाई केलेली आहे. दिवसा लाईट दिली जात नाही, रात्रीची तीही वेळेवर व कमी दाबाने मिळते अशा कठीण परिस्थिती रात्री-अपरात्री शेतकऱ्याने काबाडकष्ट करून मिळवलेल्या ऊस, मका, कापूस आणि कडधान्य यांच्यासह डाळिंब, केळी, अशा फळपिकांना सुद्धा हमीभाव करणे गरजेचे आहे. माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना कारखानदारांची काळजी आहे, शेतकऱ्यांची नाही. एफआरपीचे तुकडे करणाऱ्या कारखान्यांचे समर्थन केले जाते.

केंद्रातील नरेंद्र मोदी व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत आहे. यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या न्याय हक्काच्या लढाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला साथ द्या. महाराष्ट्रात हुंकार यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारची भूमिका शेतकऱ्यांच्या समोर मांडणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरची लढाई उतरून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ताकद द्यावी, असे मौलिक विचार बळीराजा हुंकार यात्रेचे प्रमुख शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांनी निमगाव पाटी येथील भव्य शेतकरी मेळाव्यामध्ये उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले.

यावेळी श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाशबापू पाटील, लोणंद पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथआण्णा वाघमोडे, श्री शंकर सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष भानुदास सालगुडे पाटील, ओबीसीचे तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अमरसिंह कदम, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजीकाका बागल, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विजय रणदिवे, राज्य प्रवक्ते रणजित बागल, शहाजानभाई शेख, सचिन आटकळे, युवराज घुले, ज्येष्ठ नेते भीमराव फुले, मगन काळे, डॉ. सचिन शेंडगे, कमलाकर माने देशमुख, साहिल आतार, आनंदराव मदने, अमरसिंह माने देशमुख, मदनसिंह जाधव, शुभांगीताई मोरे, अजित कोडग, रणजीतसिंह कदम, शिवराम गायकवाड, दत्ता भोसले, सचिन पिसे, प्रवीण काळे, समाधान काळे, साधू राऊत, तेजस भाकरे, अहील पठाण, प्रदीप ठवरे, विजय वाघंबरे आदींसह विझोरी, खुडूस, पिसेवाडी, विजयवाडी, पानीव, निमगाव, डोंबाळवाडी, तोंडले-बोंडले गावातील शेतकऱ्यांसह तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

शेतकऱ्यांचे पांडुरंग खासदार राजू शेट्टी यांचे आगमन होताच हलग्यांचा कडकडाट आणि फटाक्यांच्या आताषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. भव्य शेतकरी मेळाव्यात सौ. अर्चना अजित बोरकर, वर्षा ठवरे, कविता लोखंडे, सुंदराबाई लोखंडे, मंगल बोरकर, संगीता वाघंबरे, यांनी औक्षण करून शेतकऱ्याचा पांडुरंग राजू शेट्टी यांचे औक्षण करून स्वागत केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलन वीर अजितभैया बोरकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये आजपर्यंत केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला. शेतकऱ्यांना वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून राजू शेट्टी साहेब, जिल्हा अध्यक्ष तानाजी काका बागल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची माळशिरस तालुक्यात घोड-दौड सुरू असल्याचे सांगितले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाशबापू पाटील यांनी तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांच्या कार्याचे कौतुक करून भविष्यामध्ये संघटनेच्या कार्यामध्ये सहकार्य करून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सुद्धा भरीव सहकार्य करून कोणतीच उणीव ठेवणार नसल्याचे ठामपणे सांगितले. अमरसिंह कदम, रणजित बागल, तानाजीकाका बागल, ॲड. विजय रणदिवे, ॲड. सोमनाथआण्णा वाघमोडे, सोमनाथ पिसे, आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून त्यांचे स्वागत केले‌ त्यामध्ये दगडू काळे, प्रा. विठ्ठल मदने, पै. महादेव लोखंडे, श्रीधर मदने, अमोल मदने, दत्तात्रय बोरकर, हरिभाऊ चव्हाण, दीपक सावंत, सचिन बोरकर, अज्ञान कोळेकर, नेताजी मदने, बापूराव पुकळे, विराज रास्ते, यशवंत तांबवे आदी कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. भव्य शेतकरी मेळाव्यातील शेतकऱ्यांचा स्वयंस्फूर्तीने उदंड प्रतिसाद, प्रचंड गर्दी, अनेकांचा पक्षप्रवेश यामुळे भविष्यात माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना गतवैभव प्राप्त करेल, असा विश्वास उपस्थितांना झालेला आहे.

खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ अण्णा वाघमोडे यांनी गेल्या दहा वर्षापासून खंडकरी शेतकऱ्यांचा लढा उभा करून शेतकऱ्यांना जमिनी मिळवून दिलेल्या होत्या. त्याबद्दल त्यांचा सन्मान शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या शुभहस्ते हजारो शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सदरच्या मेळाव्यामध्ये केंद्र सरकारने दूध, भाजीपाला व फळांचे सहित सर्वच पिकांना हमी भाव कायदा लागू करावा, शेतीपंपाचे भार नियमन त्वरित मागे घेऊन शेतकऱ्यांना १० तास वीज उपलब्ध करून द्यावी, राज्य सरकारने भूमी अधिग्रहण कायद्यातील दुरुस्ती मागे घ्यावी, राज्य सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये केलेली बेकायदेशीर मोडतोड मागे घ्यावी व शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळावी, डिझेल, पेट्रोल दरवाढ कमी झाली पाहिजे अशा अनेक प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुक्यातील ग्रामपंचायतींना आव्हान केले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद देत माळशिरस तालुक्यातील विझोरी, तोंडले, पिसेवाडी या ग्रामपंचायतीने दोन ठराव करून खासदार राजू शेट्टी यांच्याकडे दिलेले आहेत. माळशिरस तालुक्यातून ठराव देणाऱ्या राज्यातील पहिल्या तीन ग्रामपंचायती ठरलेल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होता. दीड तास राजू शेट्टी यांनी भाषणांमधून अनेक मुद्द्यांचा परामर्श घेतला. एकही शेतकरी बांधव जागेवरून हलला नाही, शेवटपर्यंत शेतकरी बांधवांनी साथ दिली. माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

भव्य शेतकरी मेळाव्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अकलूज पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक विलासराव दोलतडे आणि श्रीनिवास कदम पाटील यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयातील प्राध्यापिका दमयंती कांबळे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान
Next articleदि सासवड माळी शुगर फॅक्टरी शेती विभागातील क्लार्क व प्रायव्हेट काम पाहणारे श्री. गणेश टिळेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here