पैठण (बारामती झटका)
अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्याविषयी अपशब्द वापरत फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केली आहे. केतकी चितळे हिने शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विरुद्ध फेसबुकवर वादग्रस्त विधान करून शरदचंद्रजी पवार साहेबांची समाजामध्ये बदनामी व्हावी, या गैरउद्देशाने सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यामुळे समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी व लोकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण व्हावी, या गैरउद्देशाने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विरुद्ध वादग्रस्त विधान केले आहे.

तसेच संत तुकाराम महाराज यांच्या अभंगचा आधार घेऊन सोशल मिडियावरून समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी. लोकांच्या भावनांना ठेच पोहोचावी, असाच गैरहेतू तिच्या पोस्ट मधून दिसून येतो. त्यामुळे केतकी चितळे विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार रोहितदादा पवार विचारमंचाचे प्रदेशाध्यक्ष राजू पाटील बोंबले, प्रदेश कोषाध्यक्ष प्रदीप घालमे, पैठण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष जितू परदेशी, मा.नगरसेवक बजरंग लिबोंरे, राजू उगले सर, गौरव आठवले, फिरोज भाई खान यांनी पैठण पोलीस स्टेशनला दिली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
