कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील भाविकांना कै. माया फाउंडेशनच्यावतीने प्रसाद वाटप.

माळशिरस ( बारामती झटका )

कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याबरोबर आलेल्या वारकरी व भाविक भक्तांसाठी कै. माया फाउंडेशनच्यावतीने प्रसाद वाटपाचा स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केलेले होते.

माळशिरस तालुक्यातील कन्या स्व. माया यांच्या मृत्यूनंतर बंधू, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी कै. माया फाउंडेशन स्थापन केलेले आहे. या फाउंडेशनचे संस्थापक योगेश लक्ष्मण गेंड, अध्यक्ष तुषार तानाजी बोकफोडे, उपाध्यक्ष विजय तुकाराम करे, सचिव राज हनुमंत मदने, खजिनदार सुनील अजिनाथ भानवसे, विश्वस्त सभासद ओंकार पालवे, राहुल सावंत, अक्षय जाधव, शुभम वाघमोडे, सुदर्शन गायकवाड, कृष्णा डोंगरे, अजय येडगे, संदीप सरगर, पै. रणजीत वलेकर, पै. संग्राम टिळे, नारायण पिसे, पै. राजकुमार वाघमोडे, महेश सरगर, प्रतीक शिंदे, पै. अनिल वाघमोडे, डॉ. राहुल केंगार, स्वप्निल देशमुख, किरण काळे, ऋषिकेश वनवे व तरुण मित्र मंडळींनी एकत्र येऊन फाऊंडेशन तयार केलेले आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.

आषाढी वारीतील माऊलींच्या पालखी सोहळ्यातील भाविकांना व वैष्णवांना प्रसाद वाटप करून स्व. माया यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

देहाने भुतलावर नसेल मात्र, माझा विचार माझ्या सामाजिक कार्यातून माझं अस्तित्व कायम जिवंत आहे, हा संदेश समाजाच्या समोर कै. माया फाऊंडेशन यांनी ठेवलेला आहे. प्रसाद वाटपाच्या ठिकाणी मायाचा फोटो फलकावर पाहिल्यानंतर वारकरी व भाविकांनी ‘धन्य ती माऊली’ असा आशिर्वाद देऊन आनंदाने प्रसादाचे सेवन करून पांडुरंगाच्या भेटीसाठी मार्गस्थ होत होते.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीची तारीख जाहीर झाली आहे.
Next articleकैवल्य साम्राज्य सर्वश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पवित्र पादुकांचे व अश्वांचे दर्शन आ. राम सातपुते व सौ. संस्कृतीताई यांनी घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here