कै. कृष्णकांतभाऊ थोरात यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

माळशिरस (बारामती झटका)

कैलासवासी कृष्णकांत भाऊ मारोतराव थोरात यांच्या 28 व्या पुण्यस्मरण निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. १८ जानेवारी २०२३ ते बुधवार दि. २५ जानेवारी २०२३ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, माळशिरस येथे समस्त थोरात परिवार व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ७ वा. प्रार्थना, सकाळी ७.३० ते १० व दुपारी ३ ते ५ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ११ ते १२ गाथा भजन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन व रात्री ११ वा. हरिजागर असा असणार आहे.

बुधवार दि. १८/१/२०२३ रोजी ह.भ.प. शिवदत्त महाराज गलांडे, जावली यांचे कीर्तन होणार असून या दिवशी सकाळचे अन्नदान डॉ. संजय पंचवाघ तर संध्याकाळचे अन्नदान आप्पासाहेब कोळेकर यांच्यावतीने करण्यात येणार आहे. गुरुवार दि. १९/१/२०२३ रोजी ह.भ.प. अमोल महाराज सुळ, मोरोची यांचे कीर्तन होणार असून सकाळचे अन्नदान विनोद वाघमोडे तर संध्याकाळचे अन्नदान नानासाहेब जगताप यांच्यावतीने करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. २०/१/२०२३ रोजी ह.भ.प. तुकाराम महाराज उराडे, नातेपुते यांचे कीर्तन होणार असून सकाळचे अन्नदान अरुणराव माने तर संध्याकाळचे अन्नदान दामोदर चोपडे यांच्यावतीने करण्यात येणार आहे. शनिवार दि. २१/१/२०२३ रोजी ह.भ.प. हनुमंत महाराज मारकड, कात्रज यांचे कीर्तन होणार असून सकाळचे अन्नदान बापूराव सरगर तर संध्याकाळचे अन्नदान कै. बाळासो सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ पांडुरंग बाळासो सुर्यवंशी यांच्यावतीने करण्यात येणार आहे. रविवार दि. २२/१/२०२३ रोजी ह.भ.प. श्रीराम महाराज अभंग, रामकुंड यांचे कीर्तन होणार असून सकाळचे अन्नदान विजय जाधव सर तर संध्याकाळचे अन्नदान कै. दगडू व भिकाबाई दणाणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दणाणे परिवार यांच्यावतीने करण्यात येणार आहे. सोमवार दि. २३/१/२०२३ रोजी ह.भ.प. नंदकिशोर महाराज पवार, निमसाखर यांचे कीर्तन होणार असून सकाळचे अन्नदान सुरेश लवटे तर संध्याकाळचे अन्नदान रणजीत सोपान काळे यांच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच रात्री १० वा. भारूडरत्न ह.भ.प. सावता महाराज फुले व सहकारी, सणसर यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. २४/१/२०२३ रोजी ह.भ.प. कैलास महाराज केंजळे, धर्मपुरी यांचे कीर्तन होणार असून सकाळचे अन्नदान सर्जेराव लोखंडे तर संध्याकाळचे अन्नदान रवींद्र पांढरे, शांतिनाथ कोळेकर, ऋत्विक पाटोळे यांच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच दु‌. ४ वा. भव्य दिव्य दिंडी नगर प्रदक्षिणा सोहळा, घोड्यांचे गोल व उभे रिंगण व रात्री जागर किर्तनानंतर नेत्रदीपक दीपोत्सव कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि. २५/१/२०२३ रोजी ह.भ.प. गुरुवर्य कैलास महाराज केंदळे धर्मपुरी यांचे काल्याचे किर्तन सकाळी १० ते १२ वाजता होणार आहे.

या सप्ताहामध्ये श्री हनुमान भजनी मंडळ, श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, संत सावता माळी भजनी मंडळ, माळशिरस, गोरडवाडी, मेडद, भांबुर्डी, डोंबाळवाडी, कचरेवाडी, तिरवंडी भजनी मंडळ यांचे जागर होणार आहे.

तरी या अखंड सप्ताहाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा, अशी नम्र विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचि. प्रसाद ढवळे आणि चि.सौ.कां. किरण काळे यांचा शुभविवाह सोहळा होणार संपन्न
Next articleमाळशिरस नगरपंचायत हद्दीत अतिक्रमणाने डोके वर काढले, प्रशासनाची डोळेझाक ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here