सौ. शितल वावरे यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात विकासात्मक कार्यासाठी केली कोथलगिरी बहुउद्देशीय संस्थेची स्थापना
कोथळे ( बारामती झटका )
कोथळे ता. माळशिरस येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शितल जयवंत वावरे यांनी सामाजिक, संस्कृतीक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात विकासात्मक कार्य करण्यासाठी कोथलगिरी बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करून धर्मदाय आयुक्त यांच्याकडे अधिकृत सभासद यांच्या सहकार्याने नोंदणी केलेली आहे.
कोथलगिरी बहुउद्देशीय संस्था कोथळे ता. माळशिरस या संस्थेची रीतसर नोंदणी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे दि. 20/10/2021 रोजी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. शितल जयवंत वावरे यांनी केलेली आहे. सदर संस्थेमध्ये श्री. राहुल नाथा माने उपाध्यक्ष, छाया सतीश दडस सचिव, श्री. गणेश सुभाष सूळ खजिनदार, तर संचालक मंडळामध्ये सौ. मनीषा शिवाजी वावरे, श्री. मच्छिंद्र वसंत उमापे, भाऊ हिराचंद दडस यांचा समावेश आहे.
धर्मदाय आयुक्त यांच्याकडे रीतसर नोंदणी केल्यानंतर समाजामध्ये अनेक सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील कामे करण्यासाठी ग्रामीण भागातील तरुण व बहुजनांचा फायदा होण्यासाठी शासन स्तरावर दखल घेतली जाते यासाठी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी असणे गरजेचे असते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng