पिलीव (बारामती झटका)
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरही दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी २२ गावांना दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प युवा नेते, निरा देवघर धरणाच्या पाण्यासाठी संघर्ष करणारे जलनायक शिवराज पुकळे यांनी २६ जानेवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केला आहे.


निरा देवघर धरणाच्या पाण्यासाठी शिवराज पुकळे यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला, प्रांत कार्यालयावर रक्तदान आंदोलन केले, संबंधित कार्यालयात मिटिंग लावून पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला आहे.


निरा देवघर धरणामध्ये कायम दुष्काळी असणारी अर्धी गावे सध्या मूळ प्रकल्पामध्ये समाविष्ट आहेत, उर्वरित गावे समाविष्ट करून निरा देवघर प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावून काम चालू करावे व माळशिरस तालुक्यातील सर्वच्या सर्व २२ दुष्काळी गावांना लागलेला दुष्काळाचा कलंक मिटावा, यासाठी वेळोवेळी मोर्चे, आंदोलन, सभा, मीटिंग व जनजागृती केली आहे. भविष्यातही गरज पडेल तिथे तीव्र भूमिका घेण्यास मागे पुढे पाहणार नाही, अशी भूमिका वाढदिवस दिनी शिवराज पुकळे यांनी बारामती झटकाशी बोलताना व्यक्त केली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
