दुसऱ्या राज्यस्तरीय एल्बो बॉक्सिंग स्पर्धेत जिल्हा एल्बो बॉक्सिंग असोसिशनच्या खेळाडूंची दैदिप्यमान कामगिरी
कोल्हापूर (बारामती झटका)
दुसऱ्या राज्यस्तरीय महाराष्ट्र एल्बो बॉक्सिंग स्पर्धेत बाळासाहेब राजाराम माने क्रिडा व शैक्षणिक संस्था व सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी संचलित कोल्हापूर जिल्हा एल्बो बॉक्सिंग असोसिशनच्या खेळाडूंनी तिसरी जनरल ट्रॉफी पटकावली. सातारा येथे दि. १९ व २० फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय एल्बो बॉक्सिंग स्पर्धेत बाळासाहेब राजाराम माने क्रिडा व शैक्षणिक संस्था, इचलकरंजी व सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी संचलित कोल्हापूर जिल्हा एल्बो बॉक्सिंग असोसिशनच्या खेळाडूंनी तिसरी जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकण्याचा बहुमान पटकावला आहे.
या स्पर्धेतमध्ये स्पृहा माने, रुची तिवारी, संस्कृती कोळेकर, सिमीन शेख, साक्षी जाधव, सुशांत बाबर, शुभम पाटील, प्रतिक पाटील, ओंकार कडव, अरमान मुजावर, विश्वेश शिंदे, प्रेम काटकर, यासीन मुल्ला, सोहम शिंदे या खेळाडूंनी सुवर्ण पदक, तर सिद्धार्थ पुरोहित, उत्कर्षा बोरगे, ओंकार परीट, सत्यम झा या खेळाडूंनी रौप्य पदक व समृद्धी बाबर हिने कांस्य पदक पटकावले आहे.

या विजयी सर्व खेळाडूंना महाराष्ट्र एल्बो बॉक्सिंगचे अध्यक्ष सुरेश कोळी सर तसेच कोल्हापूर जिल्हा एल्बो बॉक्सिंग असोशियन अध्यक्ष प्रकाश निराळे सर, सचिव निलेश परीट सर, सुशांत माने सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व खेळाडूंना अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व खजिनदार व सर्व सदस्य यांच्याकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng