क्रिकेटची पंढरी गजबजली, वेळापूरच्या पालखी मैदानावर लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा

वेळापूर (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील महिला वेळापूर लेदर क्रिकेटची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखले जाते. याच वेळापूरच्या पालखी मैदानावरती युनिटी चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ श्री अर्धनारीनटेश्वर क्रिकेट क्लबच्या खेळाडूंच्या हस्ते आज सकाळी करण्यात आला.

या स्पर्धा मतीन शेख या श्रीपूरच्या खेळाडूने सामाजिक समता, बंधुभाव व ऐक्य टिकून राहावे या हेतूने वेळापूर येथील पालखी मैदानावरती आयोजित केले असून या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून सोळा संघ सहभागी झाले आहेत. लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा 20 षटकांच्या लीग पद्धतीने खेळवल्या जात आहेत.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून साऊथ सोलापूर, उबाळे स्पोर्ट सांगोला, माळखांबी, परभणी, स्पायडर स्पोर्ट्स पुणे, समरजीतसिंह अकलूज, सांगवी अकरा पुणे, वीर सावरकर पंढरपूर, सयाजी राजे अकलूज, यश 24 वेळापूर, साहिल 11 मुंबई, कारभारी जिमखाना बारामती, पुणे पोलीस, युनायटेड 11 सोलापूर, युनिटी स्पोर्ट्स बारामती, न्यू बॅलन्स अकॅडमी श्रीपुर आदी संघांनी सहभाग घेतला आहे.

या स्पर्धेचे संयोजक मतीन शेख म्हणाले, क्रिकेट हा खेळ सामाजिक समता, बंधूभाव व ऐक्य टिकविण्याचे काम करतो. या खेळात सांघिक भावना वाढीस लागते. ही सांघिक भावना वाढावी व लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेची ग्रामीण भागातील खेळाडूंना आवड निर्माण व्हावी या हेतुने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम क्रमांकासाठी रु. ६१ हजार व युनिटी चषक तर द्वितीय क्रमांकासाठी रु. ४१ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleउंबरे दहिगाव सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. विजय ठोंबरे तर व्हाईस चेअरमनपदी सौ. ताराबाई नारनवर यांची बिनविरोध निवड.
Next articleभोसे सोसायटीच्या नवनियुक्त सदस्यांचा आ. परिचारक यांच्याहस्ते सन्मान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here