Uncategorized

खंडकरी शेतकरी व कामगारांचा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात मार्गी लावणार – महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्णा विखे पाटील.

महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष बी. डी. पाटील व सदाशिवनगर मळ्याचे अध्यक्ष भानुदास सालगुडे पाटील यांच्यामुळे खंडकरी शेतकरी, कामगार व 22 गावांचा गावठाण प्रश्न निकाली निघणार

श्रीपुर ( बारामती झटका )

शेती महामंडळाकडून खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी परत मिळालेल्या आहेत. सदर जमिनीवर भोगवाटदार वर्ग – 2 असलेली अट रद्द करून शेती महामंडळाच्या जागेमध्ये आजी माजी कामगार यांना राहण्यासाठी दोन गुंठे जागा देऊन तालुक्यातील 22 गावांना गावठाणाचा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनामध्ये खंडकरी शेतकरी कामगार व गावठाणाचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या आसवानी विस्तारित प्रकल्प शुभारंभ व गळीत हंगाम शुभारंभाच्या प्रसंगी उपस्थित जाहीर सभेमध्ये बोलताना महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माढा लोकसभेचे कार्यक्षम व लोकप्रिय खा‌. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांत मालक परिचारक, विधान परिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील, युटोपियन कारखान्याचे चेअरमन उमेश मालक परिचारक, भाजपचे प्रांतिक सदस्य राजकुमार पाटील, सोलापूर जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. यशवंतराव कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी संजीव कुमार जाधव, प्रांताधिकारी ज्योतीताई कदम, तहसीलदार जगदीश निंबाळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांच्यासह कारखान्याचे आजी-माजी पदाधिकारी, संचालक मंडळ, सभासद, कामगार, पत्रकार बांधव व पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र खंडकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बि. डी. पाटील व सदाशिवनगर शेती मळ्याचे अध्यक्ष भानुदास सालगुडे पाटील यांनी महसूल मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिलेले होते. सदरच्या निवेदनामध्ये शेती महामंडळाकडे खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या‌ सदर जमिनीपैकी 1978 साली हजार एकर व 2013 -14 साली साडेसहा हजार एकर जमीन माळशिरस तालुक्यातील श्रीपुर, सदाशिवनगर व शिवपुरी दहिगाव या मळ्याच्या कार्यक्षेत्रांमधील असलेल्या खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी परत मिळालेल्या आहेत. मात्र, सदरच्या सातबारावर भोगवाटदार वर्ग – 2 असे असल्याने सदरच्या खंडकरी शेतकऱ्यांना कर्ज अथवा जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार करता येत नाहीत. अनेक शेती महामंडळाच्या जागेमध्ये आजी माजी कामगार इतरत्र राहत आहेत. त्यांना स्वतःचे हक्काचे घर बांधण्याकरता दोन गुंठे जागा मिळावी व माळशिरस तालुक्यातील श्रीपुर, सदाशिवनगर, शिवपुरी, दहिगाव या मळ्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या 22 गावांना गावच्या विस्तारीकरणासाठी गावठाणाची आवश्यकता आहे.

त्यामध्ये सदाशिवनगर, पुरंदावडे, येळीव, जाधववाडी, भांबुर्डी, मांडवे, महाळूंग श्रीपुर, माळखांबी, बोरगाव, विठ्ठलवाडी, लवंग, वेळापूर, उघडेवाडी, खंडाळी, मिरे, दहिगाव, गुरसाळे, कुरभावी, एकशिव, डोंबाळवाडी, तांबेवाडी, कळंबोली, पिरळे अशा गावांना गावठाणाची आवश्यकता आहे, असे निवेदन बी डी पाटील आणि भानुदास सालगुडे पाटील यांनी दिले होते. व कार्यक्रमाचे संयोजक श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांतराव परिचारक यांनीही शेती महामंडळाची जमीन कारखान्याच्या विस्तारित कार्यक्षेत्रासाठी मिळावी, अशी मागणी केलेली होती. दोन्ही मागण्यांचा विचार करून महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या जाहीर भाषणांमध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये खंडकरी शेतकरी व कामगार यांच्याबरोबर गावातील गावठाण व कारखान्याच्या विस्तारीकरणाकरिता योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिलेले असल्याने ऐन दिवाळीत खंडकरी शेतकरी कामगार 22 गावातील गावठाणापासून वंचित असलेले नागरिक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort