खंडाळीचा निष्ठावान वारकरी ह.भ.प.पोपटभाऊ पताळे हरिभक्त हरपला .


खंडाळी ( बारामती झटका )


खंडाळी (ता.माळशिरस) येथील वारकरी संप्रदायातील निष्ठावान वारकरी ह.भ.प.पोपटभाऊ सर्जेराव पताळे (वयः६८) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.आळंदी पंढरीचे ते नेमाचे वारकरी होते.त्यांच्या निधनाने खंडाळीतील वारकरी संप्रदायातील पोकळी निर्माण झाली.ह.भ.प.पोपटभाऊ यांनी उभे आयुष्य वारकरी सेवेत घातले.गावात ज्ञानेश्वरी पारायण,तुकाराम गाथा पारायण,रामायण, हनुमान जयंती, रामनवमी, तुकाराम बीज, आदी सर्व धार्मिक उत्सवात ह.भ.प. पोपटभाऊ सर्वात पुढे असत दोन्ही पायाने अपंग असून शेवटपर्यंत आळंदी पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा करत होते.गावातील युवकांना संस्कारीत करण्यासाठी त्यांची शेवटपर्यंत धडपड होती.त्यांच्या जाण्याने खंडाळी गावावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात दोन भाऊ व परिवार असून ग्रा.पं.सदस्य गजानन पताळे यांचे ते जेष्ठ बंधू होते.
जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज श्री संत तुकाराम महाराज देहू संस्थान चे माजी अध्यक्ष बापूसाहेब मोरे देहूकर महाराज यांचे पोपटराव आवडते हरिभक्त होते. मळोली येथील सप्ताहामध्ये पोपटराव यांचा काल्याचे किर्तन होईपर्यंत मुक्काम असत देहूकर फडातील सर्व महाराज व वारकरी यांचा पोपटराव यांच्याशी परिचय होता पोपटराव यांचा बोलका स्वभाव असल्याने कायमस्वरूपी हरी भक्तांच्या स्मरणामध्ये पोपटराव यांची स्मृती राहणार आहे.

Previous articleकार्तिक वारी पूर्ववत करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी
Next articleऊसाच्या एफ.आर.पी.बाबत शेतकरी व साखर कारखाने यांचे मध्ये उडालेल्या गोंधळाचे वास्तव.- राजेंद्र तावरे पाटील .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here