खंडाळी ग्रामपंचायत निवडणुकीत बाबुराव पताळे आणि श्रीनाथ खटके यांच्यात लक्षवेधी लढत

सहकार महर्षी मोहिते पाटील प्रणित श्रीनाथ पॅनल खंडाळी दत्तनगर या पॅनलमधून माजी सरपंच बाबुराव पठाडे आणि सहकार महर्षी मोहिते पाटील प्रणित खंडाळी दत्तनगर समविचारी ग्रामविकास आघाडी या पॅनलकडून सामाजिक कार्यकर्ते श्रीनाथ खटके यांच्यात आमने-सामने लढत.

खंडाळी ( बारामती झटका )

खंडाळी ता. माळशिरस या गावातील थेट जनतेतील सरपंच पदाची व ग्रामपंचायत सदस्य यांची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रणित श्रीनाथ पॅनल खंडाळी दत्तनगर या पॅनलमधून बाबुराव शिवाजी पताळे व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रणित खंडाळी दत्तनगर समविचारी ग्रामविकास आघाडी या पॅनलमधून श्रीनाथ खंडू खटके यांच्यात आमने-सामने लढत लागलेली असून सदरच्या लढतीकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागलेली आहे.

बाबुराव पताळे यांनी दहा वर्ष खंडाळी ग्रामपंचायतचे सरपंच पद सांभाळलेले आहे. दहा वर्ष सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद भूषवलेले आहे. खंडाळी पंचक्रोशीत सर्व परिचित असणारे बाबुराव पताळे यांना सर्वसामान्य कुटुंबातील सामाजिक कार्यकर्ते श्रीनाथ खंडू खटके यांनी आव्हान उभे केलेले आहे. श्रीनाथ खटके यांनी सर्वसामान्य व तळागाळातील जनतेसाठी काम केलेले आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद या माध्यमातून त्यांनी अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिलेला आहे. मुरब्बी व राजकारणातील अनुभवी असणारे बाबुराव पताळे यांच्यासमोर तगडे आवाहन युवा नेते श्रीनाथ खटके यांनी उभे केलेले आहे.

मतदारांनी आशीर्वाद दिल्यास श्रीनाथ खटके जॉईंट किलर ठरतील, अशी खंडाळी पंचक्रोशीसह माळशिरस तालुक्यात राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमेडद ग्रामपंचायतीमध्ये शोभा लवटे पाटील आणि बायडाबाई झंजे यांच्यात लक्षवेधी लढत
Next articleलोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी ७८ कोटीचा निधी मतदार संघासाठी मंजूर करून आणला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here