खंडाळी (बारामती झटका)
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४८ वा राज्याभिषेक दिन व सह्याद्री प्रतिष्ठानच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त खंडाळी ता. माळशिरस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच बाबुराव पताळे यांच्याहस्ते तसेच पोलीस पाटील डॉ. सुभाष कटके, गणपत पताळे, अविनाश पताळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशिष पताळे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील दुर्गसेवकांनी रक्तदान शिबिर घेऊन तेरा वर्ष गड किल्ल्यांची माहिती चित्रस्वरुपातील फलक लावून गडकोटांचे संवर्धन कार्याचा प्रसार करण्यात आला. यावेळी १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष अलंकार पताळे, मयुर पिसे, लालासो मुजावर, विक्रम एकतपुरे, ऋषिकेश शिंदे, प्रनिल एकतपुरे, हनीफ शेख, प्रशांत देशमुख व अनेक दुर्गसेवकांनी रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतले. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने सर्व रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
