खंडाळी हायस्कूल मध्ये १० वी ची परीक्षा सुरु…

खंडाळी (बारामती झटका)

ज्ञानगंगा बालविकास मंडळ खंडाळी संचलित श्रीमती पार्वतीबाई ननवरे हायस्कूल खंडाळी, ता. माळशिरस येथे ई. १० वी बोर्डाच्या परीक्षेस सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी ७९ विद्यार्थ्यांनी मराठीचा पेपर दिला. ही परीक्षा बोर्डाच्या नियमांचे व कोरोना नियमांचे पालन करून घेण्यात आली. २०२१ मध्ये कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षा झाल्या होत्या.

ज्या प्रशालेत १५ पेक्षा जास्त विद्यार्थी १० वी ला आहेत त्याच प्रशालेत उपकेंद्र हे परीक्षेचे वैशिष्ट्य आहे. गेल्या ३० वर्षांनंतर प्रथमच खंडाळीच्या हायस्कूलमध्ये १० वी ची बोर्डाची परीक्षा होत असून कदाचीत पुढील वर्षी नविन धोरणानुसार १० वी बोर्ड असण्याची शक्यता कमी आहे. १५ पेक्षा जास्त विद्यार्थी असणारी शाळा शेवटी केंद्र बनले असल्याचे मुख्याध्यापक नानासाहेब वाघमोडे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमोटेवाडी येथील राजु हुलगे यांचे दुःखद निधन
Next articleशिक्षण क्षेत्राला बसला हादरा, जिल्ह्यात १७१ बोगस शिक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here