खर्डी (बारामती झटका)
जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणारे खर्डी येथील श्री सीताराम महाराज यांची पुण्यतिथी कार्तिक वद्य त्रयोदशीला म्हणजे 2 डिसेंबर रोजी आहे. त्यानिमित्ताने नामसप्ताहाचे आयोजन ग्रामस्थ व भाविकांनी केले आहे. दररोज नित्य पूजा, कीर्तन, प्रवचन, भजन आदी कार्यक्रम होत आहेत. समाधी मंदिर दर्शनासाठी खुले असून जागतिक महामारी कोरोना पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. येथील मंदिरात दर गुरुवारी व अमावस्येला हजारो भाविक येत असतात.तसेच वार्षिक पुण्यतिथी भंडारासाठी ही लाखो भाविक एकत्र येतात.
दिवसातून दोन वेळा पूजा, आरती, नैवेद्य, हरिपाठ असा नित्यक्रम असतो. आताही मंदिरात पूर्णपणे कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली पाळून दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी समाधी मंदिर ट्रस्ट योग्य व्यवस्थापन करीत आहे. यावेळी मुख्य विश्वस्त हरीभाऊ कुलकर्णी, अध्यक्ष दीपक रोंगे, बापू केसकर, हणमंत केसकर, हनुमान मंदिर पुजारी बाळासो मोकाशी, बापूसो केसकर, शिवाजी कांबळे आदीसह भाविक उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng