खानापूर, आटपाडी व जत विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदाची प्रदेश सचिव पै. अक्षयभैय्या भांड यांच्याकडे जबाबदारी…

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचा जिल्हा आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तालुका असल्याने कार्याची चूणूक दाखविण्याची संधी.

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव पै. अक्षयभैय्या भांड यांच्याकडे खानापूर, आटपाडी व जत विधानसभा मतदार संघाची निरीक्षक पदाची जबाबदारी दिलेली आहे. दोन्ही मतदार संघ माजी जलसंपदा मंत्री व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांचा सांगली जिल्हा व भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तालुका व मतदार संघ असल्याने पै. अक्षयभैया भांड यांना कार्याची चुणूक दाखविण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख यांनी महाराष्ट्रातील शंभर विधानसभा मतदार संघात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची निरीक्षक पदी निवडी जाहीर केलेल्या आहेत. त्यामध्ये खानापूर, आटपाडी व जत विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव पै. अक्षयभैय्या भांड यांच्याकडे दिलेली आहे.

पै. अक्षयभैय्या भांड यांचे संघटन कौशल्य चांगले आहे. युवकांना मार्गदर्शन करून सर्वसामान्य जनतेला योग्य दिशा देऊन राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवाहात कसे आणता येईल, याची रणनीती ठरविण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्याही मार्गदर्शनचा फायदा पक्ष बांधणीसाठी होणार आहे.

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तालुका व मतदार संघाचा परिसर येत असल्याने दोन्ही मतदारसंघातील धनगर समाजाला योग्य दिशा देण्यासाठी कार्य करावे लागणार आहे. दोन्ही मतदार संघ जिल्ह्याच्या व महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आहेत.

अशा संवेदनशील मतदारसंघाची निरीक्षक पदाची जबाबदारी आलेली असल्याने पै. अक्षयभैय्या भांड यांना आपल्या कार्याची चूणुक दाखवण्याची संधी मिळालेली आहे. या संधीचे सोने निश्चितपणे आजपर्यंतच्या कार्यावरून वाटत असल्याने निरीक्षक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleलोकनेते उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
Next articleश्री. गणेशभाऊ बत्तासे यांना राज्यस्तरीय ‘कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव’ पुरस्कार प्रदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here