खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार फंडातून धर्मपुरी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर

भाजपचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर यांच्या प्रयत्नातून बसविण्यात आलेल्या नवीन ट्रान्सफॉर्मरचे उदघाटन भाजपच्या महिला आघाडी सदस्या भारती निर्मळ यांच्या हस्ते संपन्न

धर्मपुरी (बारामती झटका)

माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अधीक्षक अभियंता सोलापूर मंडळ यांना जिल्हा नियोजन समिती विकास निधी योजनेतून धर्मपुरी येथे १५० ते २०० घरे असून त्या ठिकाणी संपूर्ण गावासाठी अधिकचा नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यासाठी निवेदन दिले होते. त्या निवेदनाला मंजुरी मिळाली असून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार फंडातून आणि भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर यांच्या प्रयत्नातून धर्मपुरी येथे १०० एचपी चा डीपी मंजूर होऊन आज शनिवार दि. ०४/०६/२०२२ रोजी चालू करण्यात आलेला आहे.

या डीपी चे पूजन भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या सदस्या भारती निर्मळ यांच्या हस्ते करून डीपी चालू करण्यात आला आहे. यावेळी मनीषा निर्मळ, अनिता निर्मळ, पद्मा कांबळे, प्रतिभा साबळे, सारिका पाटील, जयश्री कांबळे, भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, उत्तम निगडे, बाळासाहेब पाटोळे, बबन झेंडे, उमेश मसुगडे, दत्ता पाटोळे, माधव मोरे, विजय राऊत, बाळासो पाटील, आप्पा मसुगडे, दिपक मसुगडे, संजय मसुगडे, अमर चव्हाण, अनिल चव्हाण, भाऊ पाटोळे, संजय पाटोळे आदींसह वायरमन नवनाथ पाटील, विजय झेंडे उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांचा भाजपचे निलेश राणे यांना टोला
Next articleपुरंदावडे विविध कार्यकारी सोसायटीच्या चुरशीच्या निवडणुकीत शांततेत ४७६ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here