आमदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, प्राचार्य पि.बी रोंगे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न.
फलटण ( बारामती झटका )
माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माळशिरस नगरपंचायतचे भाजपचे नूतन नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांचा सन्मान मान खटाव चे आमदार जयकुमार गोरे भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, प्राचार्य पी.बी. रोंगे सर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित फलटण येथील राजभवन निवासस्थानी संपन्न झाला.
माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस आहे अनेक लोकांनी खासदार यांचा सन्मान केला मात्र खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा मतदार संघातील प्रतिष्ठित समजली जाणारी माळशिरस नगरपंचायत या नगरपंचायत वर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षपदाचा झेंडा फडकविला असल्याने नूतन नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांचा सन्मान करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक राजकीय विषयावर चर्चा करण्यात आली भविष्यामध्ये नगरपंचायतीला भरीव निधी देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng