माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारसंघातील नगर पंचायत व नगरपरिषदेसाठी नगर विकास खात्याकडून भरीव निधीची तरतूद केली..
माळशिरस (बारामती झटका )
माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदार संघात वैशिष्ट्यपूर्ण या योजनेअंतर्गत नगरपरिषद व नगरपंचायत च्या विविध विकासकामांसाठी ३ कोटी १० लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. मतदार संघातील करमाळा नगरपरिषद १० लाख रुपये, नातेपुते नगरपंचायत ५० लाख रुपये, माळशिरस नगरपंचायत १ कोटी ५० लाख रु., म्हसवड नगरपरिषद ५० लाख रु., माढा नगरपरिषद २५ लाख रु., महाळुंग नगरपंचायत २५ लाख रु. असा ३ कोटी १० लाख रुपयांच्या भरीव निधीची तरतूद मंजूर केलेली असल्याने माढा लोकसभा मतदारसंघात समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
माळशिरस तालुक्यातील नातेपुते, माळशिरस, महाळुंग नगरपंचायतीच्या विकासकामांसाठी भरीव निधीची तरतूद केलेली आहे. माळशिरस तालुक्याच्या विकासाला चालना देणारा फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा निरा-देवधर प्रकल्पातील रखडलेल्या कॅनलचा प्रश्न सोडवून सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. महत्त्वाच्या कामाबरोबर ग्रामीण भागातील विकास व्हावा यासाठी विकास निधीची तरतूद करून समाजामध्ये व जनतेमध्ये कार्यातून वेगळी ओळख निर्माण केलेली असल्याने कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यावर माढा मतदार संघासह माळशिरस तालुक्यातील जनता समाधानी आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng