माळशिरस ( बारामती झटका )
माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेकडून पालखी महामार्गावर ‘येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे सहर्ष स्वागत’ असे फलक माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने लावलेले आहेत. त्यावरील खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे वारकऱ्यांचे सहर्ष स्वागत येणा-जाणाऱ्यांचे लक्ष केंद्रित होत आहे.गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना संसर्ग रोगामुळे अनादी कालापासून सुरू असलेली श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालखीचा पायी वारी सोहळा खंडित झालेला होता. मात्र, यंदाच्या वर्षी सर्वच संतांचा पायी वारी सोहळा सुरू आहे. माळशिरस तालुक्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या अनेक मार्गाने येत असतात.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाचे विस्तारीकरण होऊन महामार्गामध्ये रूपांतर करण्यात आलेले आहे. यामध्ये माढा लोकसभा मतदार संघामधून विशेष करून माळशिरस तालुक्यातून श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज यांचे पालखी महामार्ग जात आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, रस्ते विकास मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा करून पालखी महामार्ग विस्तारीकरणासाठी सतत प्रयत्नशील होते. सध्या दोन्ही पालखी महामार्गाचे उड्डाणपूल वगळता काम पूर्ण होत आलेले आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या व देहू आळंदीकडे जाणाऱ्या सर्व वारकरी भाविक भक्तांची वर्दळ वाढलेली आहे. पालखी मार्गावरून चालण्यासाठी पालखीच्या पुढे उच्चवर्णीय लोक चालत असतात. सध्या पालखी महामार्गावर भाविकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहर्ष स्वागत या फलकाकडे भाविकांचे लक्ष केंद्रित होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng