खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सणसर येथे भव्य ऊस परिषदेचे आयोजन

सणसर (बारामती झटका)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली भव्य ऊस परिषदेचे आयोजन बुधवार दि. २ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वा. सणसर बाजारतळ, ता. इंदापूर, पुणे येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमा वेळी पृथ्वीराज बापू जाचक मा. अध्यक्ष, साखर संघ पुणे, सतीश भैया काकडे शेतकरी कृती समिती जिल्हा अध्यक्ष, अविनाश दादा घोलप मा. चेअरमन श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, प्रकाश तात्या बालवडकर प्रदेश उपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, अमरसिंह कदम युवा प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, राजेंद्र ढवण अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी उपस्थित असणार आहेत.

या परिषदेमध्ये काही मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ऊसाला एक रकमे एफ आर पी मिळालीच पाहिजे, मागील हंगामातील एफ आर पी + दोनशे रुपये मिळालेच पाहिजेत, चालू हंगामातील एफआरपी + साडेतीनशे रुपये मिळालेच पाहिजे, काटामारी संपुष्टात आणण्यासाठी वजन काटे ऑनलाइन झालेच पाहिजे, मशीनने तोडलेल्या उसाची कपात 4.5 ऐवजी १.५ झाली पाहिजे, उत्पादन खर्चाला दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे, सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शेतीपंपास दिवसा बारा तास पूर्ण क्षमतेने वीज मिळालीच पाहिजे, ऊस वाहतूकदारांची तोडणी कामगारांकडून फसवणूक टाळण्यासाठी कै. गोपीनाथ मुंडे महामंडळातर्फे तोडणी कामगार उपलब्ध करून दिले पाहिजे, अशा मागण्या यावेळी असणार आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन राजाभाऊ कदम अध्यक्ष पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी पक्ष, राजेंद्र सपकळ सचिव पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना, विकास बाबर बारामती तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, बाबासाहेब झगडे अध्यक्ष इंदापूर तालुका स्वाभिमानी शेतकरी पक्ष, संतोष रणवरे अध्यक्ष इंदापूर स्वाभिमानी शेतकरी संघटना, सुखदेव जाधव संघटक बारामती तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना, विलास सस्ते कार्याध्यक्ष बारामती तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना, मधुकर वाघमोडे युवा आघाडी अध्यक्ष इंदापूर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनोज घोळवे इंदापूर तालुका संघटक स्वाभिमानी शेतकरी संघटना, विकास सोनवणे दौंड तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, विशाल भोईटे उपाध्यक्ष इंदापूर तालुका सावनी शेतकरी संघटना, विशाल काळे युवा नेते, गजानन चव्हाण युवा अध्यक्ष इंदापूर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना, सचिन वाघमोडे युवा नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यावतीने आयोजन करण्यात आले असून या परिषदेत शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल ट्रस्टची जमीन विक्री लिलावाला मुदतवाढ मिळाली.
Next articleसदाशिवनगरचा शेतकरी पुत्र जागतीक शास्त्रज्ञ यादीत समाविष्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here