सातारा ( बारामती झटका )
दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असताना अन् प्रदूषणात देखील वाढ होत असल्याने श्री श्री रविशंकर यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक बाईकचे दालन असलेल्या साई सेव्हन व्हेंचर्सचे उद्घाटन नुकतेच खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्याहस्ते साताऱ्यात संपन्न झाले. दरम्यान, साई सेव्हन व्हेंचर्सच्या निमित्ताने ऐन दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सातारकरांना विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक बाईक घेण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे.

दरम्यान, खा.उदयनराजे यांच्याहस्ते दालनाचे उद्घाटनवेळी साई सेव्हन व्हेंचर्सचे कार्यकारी संचालक राजकुमार कोळेकर, हायसा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपभाई मोटवानी, श्री श्री सदगुरू साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब कर्णवर, चांदी उद्योजक लक्ष्मणराव कोळेकर, आदित्यराज बिल्डर्सचे अमोल बनगर, अमोल कर्णवर, सुर्यकांत काळेल, बापुराव टेळे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री श्री सदगुरू साखर कारखान्याचे संचालक उत्तमराव खांडेकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उद्योजक हणमंतराव चवरे, रणजित सावंत, सुधाकर भोसले, उद्योजक संग्राम बर्गे, सचिन वावरे, तानाजीराव पवार, वैभव कोळेकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, हायासा या मूळ कंपनीचे चार मॉडेल दालनात उपलब्ध असून त्यामध्ये कॉलेज युवक – युवतींसाठी दक्ष हे मॉडेल उपलब्ध आहे. त्याचबरोबर महिलांसाठी खास असे इरा तर डिलेव्हरी बॉयसाठी निर्भर आणि युवकांसाठी हाय स्पीड असे ओजस हे मॉडेल दालनात उपलब्ध करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे केवळ दोन ते तीन तासात बाईक चार्ज केल्यानंतर तब्बल ९० कि.मी. अंतर सर्व वाहने चालत असल्याने सध्या संपूर्ण भारतात ह्या वाहनाच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng