खुडूस गावच्या शिरपेचामध्ये धीरज सरगरने रोवला मानाचा तुरा, खुडूसकरांना सार्थ अभिमान…
खुडूस ( बारामती झटका )
खुडूस ता. माळशिरस येथील धिरज सुखदेव सरगर यांनी दि. २३/२/२०२२ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथे ९५ किलो वजन गटात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याची नॅशनल (राष्ट्रीय) स्पर्धेसाठी पंजाब (चंदीगड) येथे निवड झाली आहे. त्याच्या निवडीने सर्व स्तरावरुन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्रआबा पाटील, माजी सरपंच ॲड. शहाजीकाका ठवरे, रामनाना चौगुले, माजी उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे यांच्यासह अनेकांनी निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.
खुडूस हे गाव क्रीडा क्षेत्रात पहील्यापासुनच अग्रेसर असल्याने खो-खो, कबड्डी, कुस्ती आदी क्रीडाक्षेत्रात महाराष्ट्रासह देशपातळीवर अनेक खेळाडू चमकले असुन अनेक क्षेत्रात खेळाडू उच्च पदावर असुन खुडूसचे नाव दिमाखात डोलत असल्याने वेटलिफ्टींग मधील धिरज सरगरच्या या दैदिप्यमान यशाने यात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याला या यशाबद्दल खुडूसमधील क्रिडाशोकीन व ग्रामस्थ, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील लोकांनी तसेच हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng