बापू लोंढे यांनी सुरू केलेले सामाजिक उपक्रम अखंडपणे चालू ठेवणार – पोलीस पाटील दत्तात्रय कांबळे पाटील.
खुडूस ( बारामती झटका )
खुडूस तालुका माळशिरस येथील फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष कालकथित ज्ञानदेव उर्फ बापू लोंढे यांच्या रविवार दिनांक 10 ऑक्टोंबर 20 रोजी जयंतीनिमित्त महात्मा फुले पुतळा परिसर खुडूस येथे बापू लोंढे मित्र परिवार व फुले-शाहू-आंबेडकर बहुउद्देशीय मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर कोरोना नियमांचे पालन करून घेतलेले आहे. प्रत्येक रक्तदात्यास बाप्पू लोंढे यांचे चित्र असलेले ट्रॅक सूट भेट देण्यात येणार आहे. बापूराव लोंढे यांनी फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम सुरू केलेले होते ते अखंडपणे चालू ठेवणार असल्याचे खुर्द गावचे पोलीस पाटील दत्तात्रय कांबळे उर्फ डी एल कांबळे पाटील यांनी सांगितले.
युवराज ज्ञानू लोंढे व सौ आनंदाबाई युवराज लोंढे यांना दोन मुले सागर व ज्ञानदेव अशी मुले आहेत त्यापैकी ज्ञानदेव उर्फ बापू लोंढे यांचे 1 मे 2021 रोजी अपघाती दुःखद निधन झालेले होते बापू लोंढे यांना रूपाली पत्नी व प्रेम आणि रत्नदीप दोन मुले आहेत.

बापू लोंढे शाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसा घेऊन खुडूस पंचक्रोशी मध्ये सामाजिक कार्य करीत होते त्यांनी फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय मंडळाची स्थापना केली होती त्या मंडळाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर अशा महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी च्या दिवशी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असतात खुडूस मध्ये पहिल्यांदा भीम जयंती उत्सवाला सुरुवात केली, शरीर सौष्ठत्व स्पर्धा घेतली, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, खाऊ वाटप ,वृक्षारोपण, समाज प्रबोधन करण्यासाठी व्याख्याने अनेक सामाजिक कार्यक्रम बापू लोंढे मित्रपरिवार यांच्या मदतीने उपक्रम राबवित होते. बापू लोंढे यांचे दुःखद निधन झाल्यानंतर त्यांचा पहिल्यांदाच जन्मदिवस 10 ऑक्टोंबर रोजी येत आहे त्या निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .बापूराव यांनी केलेले सामाजिक उपक्रम अखंडपणे चालू ठेवणार असल्याचे मत खुडूस गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील डीएल कांबळे पाटील यांनी सांगितले. सर्वांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावे संपर्कासाठी दत्तात्रय कांबळे 9890144759 किशोर आव्हाड 9604008005 रणजित कांबळे 8830289596 सुदेश बनकर 9604535069 बापू वसेकर 9860631078 सिद्धार्थ काटे 9890129376 या नंबरशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng