खुडूस येथील श्रीमती पार्वती विठ्ठल ठवरे पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..

माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्रआबा ठवरे पाटील यांना मातृषोक…

खुडूस (बारामती झटका)

खुडूस ता. माळशिरस, येथील श्रीमती पार्वती विठ्ठल ठवरे पाटील यांचे वयाच्या ९० व्या वर्षी रविवार दि. ०२/०४/२०२३ रोजी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्रआबा ठवरे पाटील यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर राहत्या निवासस्थानाशेजारील शेतामध्ये शोकाकुल वातावरणात सकाळी ९ वा. अंतिम संस्कार करण्यात आलेले आहे.

श्री. विठ्ठल व पार्वती यांनी प्रतिकूल परिस्थितीत सुखी संसार केला. त्यांना पाच मुले आहेत. शेतकरी दांपत्य असतानासुद्धा त्यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून उच्च शिक्षण देऊन समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. मच्छिंद्र आबा यांनी माळशिरस पंचायत समितीच्या सभापती पदावर काम केलेले आहे. गणपत यांनी पाटबंधारे विभागांमध्ये उप अभियंता पदावर काम करून सध्या ते सेवानिवृत्त आहेत. ॲड. शहाजीकाका यांनी खुडूस गावच्या सरपंच पदाची धुरा सांभाळलेली आहे. उर्वरित दोन मुलांचा उत्कृष्ट शेती व द्राक्षाच्या नर्सरीच्या व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू आहे.

काही वर्षांपूर्वी विठ्ठल ठवरे पाटील यांचे दुःखद निधन झालेले होते. श्रीमती पार्वतीबाई पितृत्व आणि मातृत्वाची जबाबदारी सांभाळत होत्या. अचानक पार्वती बाई यांचे दुःखद निधन झालेले असल्याने ठवरे पाटील परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. परिवाराला दुःखातून सावरण्याचे बळ देवो व मृतात्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली.

पार्वतीबाई यांचा रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम मंगळवार दि. ४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७ वा. खुडूस येथील राहत्या घराशेजारी शेतामध्ये अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या विरोधात तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर…
Next articleएकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे ५५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here