खुडूस (बारामती झटका)
खुडूस ता. माळशिरस येथील वनविभागाच्या जागेत विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या व इतर पारधी समाजातील शिवाजी काळे व त्यांचे कुटुंबीय गेल्या चार ते पाच वर्षांपासून गट नंबर 286/2 या गटात शिवकृपा पोल्ट्री नजीक वास्तव्य करून राहत आहेत. सदर कुटुंबाचा नाहक त्रास शेजारील शेतकऱ्यांना व येणा-जाणार्या ग्रामस्थांना होत असल्याबाबत खुडूस ग्रामपंचायतीने विचारणा केली. हे कुटुंब जाणीवपूर्वक इतर शेतकऱ्यांच्या पिकांची व फळझाडांची नासाडी करत असल्याने सदर व्यक्तीस वेळेत वनविभागाच्या जागेतून बाहेर न काढल्यास इतर कुटुंब सदर ठिकाणी वास्तव्यास येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच गावातील लोक ज्यांना जागा नाही, असे लोक सदर कुटुंबास नाही काढल्यास आम्हीही याठिकाणी आमचे घरे घालून वास्तव्य करू असे म्हणत आहे. तरी सदर बाबतीत वनविभागाकडून लोकांच्या संरक्षणार्थ योग्य ती कारवाई करून सदर घरे वन विभागाच्या जागेतून काढण्यात यावीत, या आशयाचे पत्र माळशिरस वन विभाग व सोलापूर उपवन संरक्षण विभाग सोलापूर यांना खुडूस ग्रामपंचायतीच्या वतीने दि. 20/9//2021 व सोलापूर येथे दि. 23/09/2021 रोजी देण्यात आले होते. सदरील अर्जावर वनखात्याकडून कारवाई करण्यात आली नसल्याने व वनविभागच झोपेचं सोंग घेत असल्याने शेतकरी व स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त होत असून वन विभागाने त्वरित यावर योग्य कारवाई करावी व वनविभागाच्या जागेत विनापरवाना वास्तव्य करणाऱ्यांना ताबडतोब तेथून काढावे अशी मागणी खुडूसमधील शेतकरी व स्थानिक नागरिक करत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng