खुडूस (बारामती झटका)
खुडूस येथे बी.आर. प्रतिष्ठान व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच महालिंगेश्वर विद्यालय खुडूस यांच्या संयुक्त विद्यमानाने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी खुडूस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व 26/11 मधील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच संविधानाचे वाचन व शपथ घेण्यात आली. त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचे व प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बी.आर. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रेमसिंह कांबळे पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य विशद करत त्यांनी कोणत्याही एका जातीसाठी समाजासाठी काम केले नसून त्यांनी संबंध भारतीयांसाठी काम केल्याचे सांगितले. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या सौ. कोळेकर मॅडम यांनी संविधानावर विश्लेषणात्मक माहीती सांगुन संविधान हा मूलभूत पाया असून सर्व समुदायातील लोकांना एकसंध ठेवण्याचे काम संविधानात केले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच वंचित घटकांसाठी काम केल्याचे त्यांनी सांगितले व महापुरूषांना जातिपातीत न वाटून घेता त्यांचे कार्य समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवा असे सांगितले. तसेच यावेळी रिपाइंचे नेते ज्ञानदेव कांबळे पाटील यांनी भारतीय राज्यघटना यावर बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य विशद केले.
यावेळी सांगली शिक्षण संस्था सांगली गुणवत्ता शोध परीक्षेतील कुमारी- ईश्वरी महादेव ठवरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुडूस केंद्र गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण श्रावणी संजय चौगुले, इयत्ता दुसरी वर्ग स्तर प्रथम क्रमांक अनुष्का बाळू बनकर, इयत्ता तिसरी वर्ग स्तर प्रथम क्रमांक कुमार मुस्तफा हैदरशा पिरजादे, इयत्ता चौथी स्नेहल रामचंद्र चव्हाण, इयत्ता सहावी केंद्र गुणवत्ता यादीत क्रमांक एकने उत्तीर्ण यांचा सन्मान माळशिरस न्यायालयाचे सरकारी वकील कोळेकर साहेब व सौ. कोळेकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच यावेळी बोलताना रणजित ठवरे यांनी सांगितले की , प्रत्येक वर्गामध्ये अर्धा तास संविधानाचे वाचन होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास खुडूस ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच विनायक ठवरे सर, माळशिरस न्यायालयाचे सरकारी वकील कोळेकर साहेब, कोळेकर मॅडम, माजी सरपंच ॲड. शहाजी ठवरे, लक्ष्मण कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बाजी नाना सरगर, ॲड. सिताराम झंजे, ग्रामपंचायत सदस्य अजित कांबळे, दादासाहेब साठे, अंकुश ठवरे, रिपाइंचे राम कांबळे, पिंटू लोखंडे, पप्पू कांबळे, जि. प. शाळा खुडूसचे मुख्याध्यापक लावंड सर, महालिंगेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक स्वामी सर आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित कांबळे, विक्रम गोरवे, प्रविण कांबळे, समीर काझी यांनी परीश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेमसिंह कांबळे पाटील यांनी मानले व आभार देवेंद्र कांबळे यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng