खुडूस येथे स्व. बापू लोंढे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रम संपन्न

खुडूस (बारामती झटका)

खुडूस येथे कालकथित बापू लोंढे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, सदर कार्यक्रमास माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईजे, माजी सभापती मच्छिंद्र ठवरे, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, रिपाई नेते एन के साळवे, मिलिंद सरतापे, रंजीत सातपुते, तसेच चळवळीचे नेते विकास धाईजे, जनविद्रोहीचे संपादक कुमार लोंढे, खुडूस गावचे माजी सरपंच शहाजी ठवरे,खुडूस गावचे लोकनियुक्त सरपंच विनायक ठवरे सर, सदाशिव ठवरे, उमेश कांबळे, बंडू कांबळे, रिपाईचे राम कांबळे, यशवंतगर कारखान्याचे संचालक रामचंद्र (नाना) ठवरे, माजी संचालक केशव(बापू) ठवरे, वस्ताद ज्ञानदेव (नाना) लोखंडे,प्रगतशिल बागायतदार अनंतराव(तात्या) ठवरे, संयोजक तथा पोलिस पाटील डी.एल. कांबळे, माजी उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे,चंद्रकांत लोंढे, कांतीलाल कांबळे, दिनेश कांबळे , प्राध्यापक भोपळे सर, अरविंद भोसले, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष रजनिष बनसोडे, चैतन सम्राटचे संपादक नागेश लोंढे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन लोंढे, ग्रामसेवक करे भाऊसाहेब, धाइंजे भाऊसाहेब आदी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमासाठी सुदेश बनकर, बापू वसेकर, सिद्धार्थ काटे, रंजीत कांबळे, किशोर आव्हाड, सिद्धार्थ मोटे, आदींनी परिश्रम घेतले.यावेळी बोलताना सर्व नेतेमंडळींनी स्व. बापू लोंढे यांच्या कार्याविषयी आढावा घेतला व बापूची समाजाप्रति असणारी तळमळ जिद्द चिकाटी व कोणत्याही समाजातील व्यक्तीला आपलेसे करून कोणाचाही वाढदिवस कोणताही कार्यक्रम असला की बापू आपुलकीने साजरा करत असत व आजही आपल्यात बापु असल्याचे जाणवत असून बापू आपल्यातून गेल्याचे आजही वाटत नसून आपल्यातच असल्याचे जाणवत असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली व एक उमदा तरुण चळवळीतील कार्यकर्ता आपण हरवला असल्याची खंत यावेळी उपस्थित नेतेमंडळींनी व चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली व स्व: बापू लोंढे यांचे समाज उपयोगी असणारे काम त्यांच्या मित्र मंडळी आणि कार्यकर्त्यांनी असेच पुढे चालवावे अशी अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली.

सदर रक्तदान शिबिरास अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून बापू लोंढे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले या रक्तदानासाठी अक्षय ब्लड बँक यांनी या कॅम्पचे आयोजन केले होते रक्तदात्यास प्रमाणपत्र व स्वर्गीय बापू लोंढे यांचा फोटो असलेला ट्रॅकसूट देण्यात आलासदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण वाघमारे यांनी केले व आभार बबलु आव्हाड यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपठाणवस्तीचे माजी उपसरपंच एजाज फैजखान पठाण यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा.
Next articleराम यांनी आमदार नसताना दिलेले वचन आमदार झाल्यानंतर पूर्ण केल्याने एक वचनी रामाचा प्रत्यय आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here