गंजगावा येथिल महिला सरपंच फक्त नावाला…! पण पतीराज सरपंच म्हणून फेरी मारतो गावाला…!

बिलोली (बारामती झटका)

बिलोली तालुक्यातील गंजगाव गावामध्ये महिला सरपंच असताना देखील त्यांचे पतीराज किंवा नातेवाईक त्यांच्या कामात लुडबुड करताना दिसतात.ग्रामपंचायत मध्ये जास्तीतजास्त लोकसहभाग वाढवा आणि महिलांना अनुसूचित जाती- जमाती यांना आपला हक्क आणि अधिकार सुरवातीच्या काळात ग्रामीण व्यवस्थेत असलेल्या ग्रामपंचायत स्तरावरून मिळावेत म्हणून सरपंच पद व सदस्य पदाचे आरक्षण तसेच राजकारणात महिलांना समान हिस्सा कायद्याच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.महिला आरक्षणातील मुख्य उद्देश हाच आहे की महिलांना राजकारणाच्या पटलावरती मुख्य प्रवाहात आणून त्यांचे अधिकार त्यांना प्रदान करणे.मात्र या मुख्य उद्देशालाच गंजगाव ग्रामपंचायतीमध्ये हरताळ फासण्यात येत आहे.
महिला सरपंच तर आहेत परंतु या महिलांना स्वतः च्या मनाने गावच्या विकासाची कोणतीही ध्येय,धोरणे आणि निर्णय घेऊन दिला जात नसून त्या सर्व महिला सरपंच यांचे पती हाणमंतराव कनशेटे यांनी ग्रामपंचायत मध्ये हस्तक्षेप करून नको तो रुबाब दाखवत आहेत. गावातील नागरिकांना व .ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंग साठी महिला सरपंच व महिला सदस्य यांची उपस्थिती अनिवार्य असते.तरीही त्यांचे शिवाय त्यांचे पती हणमंतराव कनशेटे बैठका अटपट एवढेच नव्हे तर त्यांच्या वतीने त्यांच्या सह्या ही ते करत आहेत.नागरिकांना ग्रामपंचायत मधून एखादा दाखला हवा असेल तर त्या दाखल्यांवर ही हेच पतीच सह्या करतात.
महिला सरपंच यांच्या कामामध्ये लुडबुड करणाऱ्या सरपंच म्हणून उगीचच गावातून मिरवणाऱ्या महिला सरपंचाच्या पतीदेव वर व नातेवाईक यांच्यावर गैरवर्तणुकीबद्दल मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३९ (१) अन्वये कारवाई केल्याशिवाय त्यांना कायमची अद्दल घडणार नाही,अशी बहुतेक ग्रामस्थांमध्ये चर्चा होत आहे. या बाबीकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष घालणे गरजेचे आहे
.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहाराष्ट्रातील राजकीय पक्षांचा सत्तेचा हुकमी एक्का रामदास आठवले बी. टी. शिवशरण
Next articleमोरोची विद्यालयाच्या माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकांच्या प्रीती भोजनासह स्नेहसंमेलनाचे आयोजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here