श्री. गणेश याग, अभिषेक, मोदकांचे हवन. कार्यक्रमास सोबत ह. भ.प.अंकुश महाराज रणखंबे गिरवीकर यांचे सुश्राव्य किर्तन.
श्री. शंभू महादेव चारीटेबल ट्रस्ट गणेषगाव यांच्या वतीने सर्व गणेश भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गणेश यागाचे 14 वे वर्ष आहे.
गणेशगाव ( बारामती झटका )
गणेश गाव तालुका माळशिरस येथील श्री स्वयंभू गणेश मंदिर येथे सालाबाद प्रमाणे श्री गणेश याग व इतर कार्यक्रम गणेश जयंती निमित्त शुक्रवार दिनांक 04/02/2022 रोजी सकाळी नऊ वाजले पासून रात्रीचे दहा वाजेपर्यंत कार्यक्रम आहे तरी गणेश भक्तांनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री शंभूमहादेव चारीटेबल ट्रस्ट गणेश गाव श्री गणेश याग समिती गणेश श्री गजानन सेवाभावी संस्था गणेश गाव श्री दशरथ मोरे पाटील मित्र मंडळ गणेश गाव व समस्त ग्रामस्थ गणेश गाव यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.
श्री स्वयंभू गणेश मंदिर येथे श्री गणेश मूर्ती ग्राम प्रदक्षणा सकाळी 9 ते 10 या वेळेत होणार आहे गणेश याग सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये श्री गणेश याग तेहतीस ब्राह्मणांकडून गणपतीच्या मूर्तीला गणपती अथर्व शीर्ष याचे 1100 वर्तनाचा अभिषेक करून 1100 मोदकांचे हवन केले जाते. सायंकाळी 4 ते 6 या वेळेत ह भ प अंकुश महाराज रणखंबे गिरवीकर यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे महाप्रसाद सायंकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत सुरू राहणार आहे.

चिंता क्लेश दारिद्र्य यांचा नाश करून बुद्धि वाढविणाऱ्या श्रीगणेशाची जयंती सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या श्री स्वयंभू गणेश मंदिर गणेशगाव व श्री शंभू महादेव चारीटेबल ट्रस्ट गणेशगाव यांच्या वतीने गणेशयाग गेली तेरा वर्षापासून सुरू आहे हे चौदावे वर्ष आहे यानिमित्त सर्वांनी गणेश याग दर्शन व महाप्रसादासाठी उपस्थित रहावे असे श्री शंभू महादेव चॅरिटेबल ट्रस्ट गणेशगाव अध्यक्ष शरद मोरे पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय गोरे, सचिव दशरथ मोरे पाटील, संचालक पोपट रुपनवर, वीरेंद्र पांढरे, दत्तात्रेय रेडे पाटील, केशव सोलनकर ,संभाजी बनसोडे, सागरराजे मोरे पाटील यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे सदर कार्यक्रमास विशेष सहकार्य अर्जुनसिंह मोहिते पाटील , शंतनुभैय्या माने देशमुख, स्वप्नीलभैया वाघमारे, रोहितदादा पाटील, निशांत कोकाटे पाटील ,ज्ञानेश्वर मुंडफणे पाटील, धनंजय भगत, वीरेंद्र पांढरे, राजेंद्र भोसले, प्रभाकर पाटील, विजय ताटे देशमुख, जालिंदर लिगडे, गणेश महाडिक पाटील, बाबुशेठ चव्हाण ,निलेश शिंदे, विशाल गायकवाड ,दीपक शेंडगे, सागर कन्हेरे ,अमोल एकतपुरे ,संतोष चव्हाण, बंटीशेठ भगत, इंद्रजीत नलवडे, प्रकाश साठे ,तात्यासाहेब कोळेकर, अक्षय भगत, विजय महंकाळ, योगेशकाका पराडे ,आकाश पराडे पाटील, महेशकाका बेंद्रे, प्रदीप साबळे ,अनिल भोसले, भारत इंगळे आदी मान्यवरांची विशेष सहकार्य लाभले आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng