गणेश उत्सवाच्या अनुषंगाने अवैद्य धंदे व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या 19 इसमांना तालुक्यातून हद्दपार करण्यात आले.

माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून धाडसी कारवाई

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैद्य धंदे व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या इसमांवर गणेश उत्सव कालावधीत तालुक्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. गणेशोत्सव 2022 निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलीस ठाणे यांचेकडून 19 इसमांवर माळशिरस तालुक्यातून हद्दपार करण्याची धाडसी कारवाई केलेली आहे.

माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीत 116 गणेश मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. सर्व गणेश उत्सव मंडळांना पोलीस ठाणेकडून ऑनलाइन परवानगी देण्यात आलेली आहे. पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांच्या गावोगावी व पोलीस ठाणे येथे मीटिंग झालेल्या आहेत. गणेशोत्सव शांततेत व सार्वजनिक उपक्रम राबवून पर्यावरण पूरक व डॉल्बीमुक्त साजरा करणे याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

गणेश उत्सव 2022 हा निर्विघ्नपणे पार पडावा व सदर कालावधीमध्ये पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून माळशिरस पोलीस ठाणेकडून अवैध दारू विक्री करणारे व गणेश उत्सव कालावधीत गुन्हे दाखल असणारे व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे पोलीस ठाणे हद्दीतील 19 इसमांना माळशिरस तालुक्यातून हद्दपार करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी धाडसी कारवाई केलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमांडवे गावात आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची २३१ वी जयंती साजरी
Next articleमाळशिरस शहरात गौरी गणपती सण उत्साहात साजरा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here