गोरडवाडी ( बारामती झटका )
गतवर्षी 2021 या इंग्रजी नवीन वर्षाच्या 1 जानेवारी दिवशी हार्दिक शुभेच्छा गोरडवाडीचे माजी सरपंच नानासाहेब कर्णवर पाटील यांना दिलेल्या होत्या मात्र यंदाच्या 2022 नवीन वर्षात एक जानेवारी रोजी मित्राचे मासिक जेवण्याची दुर्दैवी वेळ संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्यावर आलेली आहे.
स्वर्गीय नानासाहेब कर्णवर पाटील यांचे चिरंजीव श्री श्री सद्गुरु साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांना उसाचा प्रश्न व नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा देण्याकरता फोन केलेला होता. ऊसा संदर्भात व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या नंतर बाळासाहेबांनी नानांचे मासिक आहे. आपण मासिक जेवणासाठी यावे असे सांगितले. नियमित मासिक जेवणारी एक व्यक्ती आहे मात्र ज्या दिवशी नानांचे मासिक असते त्या दिवशी सकाळी नानांचे मित्र असणारे कोणाचाही कामानिमित्त फोनवर संपर्क झाल्यास त्यांनाही मासिक जेवणाचे आमंत्रण देत असतो. यापूर्वी पोलीस उपाधीक्षक अंकुशराव इंगळे यांच्यासह अनेक नानांचे मित्र मासिक दिवशी जेवून गेलेले आहे तरी तुम्ही बरोबर 12 वाजता यावे असे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना सांगितले त्याप्रमाणे कदम पाटील नानांचे मासिक जेवण करता गेलेले होते. नानांची आणि कदम पाटील यांची मैत्री आता उठत होती दोघांमध्ये वयाचे बंधन नव्हते नानांचे मित्र लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत होते नानांनी आयुष्यामध्ये अनेक माणसे जोडली नानांनी अडचणीत असणाऱ्या लोकांना नेहमी मदत केलेली आहे त्यामुळे नानांची आठवण कायम अनेक लोकांना येत असते. कोणत्याही सुख दुःखाच्या प्रसंगांमध्ये नाना हजर राहत होते. माळशिरस मधील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामधील म्हसवड रोड येथे नानांचा बसण्या उठण्याचा ठेपा होता कायम त्या ठिकाणी नाना अनेकांना भेटत असत. नानांच्या अकाली मृत्यू चा चटका अनेकांना लागलेला आहे. परिवारातील सदस्य यांना पावलोपावली नानांची आठवण येत आहे. बघता बघता नानांचे 6 वे मासिक आज 1 जानेवारी 2022 रोजी संपन्न झालेली आहे गतवर्षी इंग्रजी नवीन वर्षाच्या सुरुवातीस शुभेच्छा नानांना दिलेल्या होत्या मात्र यंदाच्या वर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीस मासिक जेवण्याची दुर्दैवी वेळ वेळ आहे. नानांच्या घरी गेल्यानंतर अनेक आठवणीला उजाळा मिळालेला होता प्रथम वर्ष श्राद्ध 23/07/2022 रोजी येत आहे त्यानिमित्त त्यांच्या कारकिर्दीमध्ये घडामोडी घडलेले आहेत याचा आढावा अंक प्रकाशित केला जाणार आहे तरी नानांच्या विषयी कोणाकडे त्यांच्या आठवणी किंवा प्रसंग असतील तर त्यांनी संपादक श्रीनिवास कदम पाटील 98 50 10 49 14 या नंबरची संपर्क साधावा.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng