तालुक्यातील ९ ते २० वयोगटातील कुमारवयीन मुलींना मोफत लसीकरण करण्यात येणार – डॉ. श्रध्दा जवंजाळ संस्थापक, कॅन्सर पेटंट ऍड असोसिएशन इंडिया
अकलूज (बारामती झटका)
भारतात २० टक्के महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण आहे. त्यापैकी जवळपास ६० ते ७० टक्के महिला या रोगामुळे मृत्यु पावतात. हा रोगच होवू नये म्हणून आता अकलूजला मोफत लसीकरण करण्यात येणार असून पालकांनी आपल्या ९ ते २० वयोगटातील मुलींना हे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सतीश दोशी यांनी केले .

अकलूजच्या कॅन्सर पेटंट ऍड असोसिएशन इंडिया, पिंक रिव्होल्यूशन व अपोलो हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज येथे मोफत लसीकरण करण्यात येणार असून याची नोंदणी डॉ. श्रध्दा जवंजाळ यांच्या सहारा नर्सिंग इंस्टीट्यूट, अकलूजमध्ये सुरु करण्यात आली आहे. किमान २५० व अधिकाधिक ५००० मुलींना याचे लसीकरण करण्यात येणार आहे. बाजारात ३८०० रुपये या लसीची किंमत असून त्याचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर एक महिन्याने दुसरा व सहा महिन्यानंतर तिसरा डोस दिला जाणार आहे. राज्यात साडेतीन लाख महिलांचा समुह तयार करण्यात आला असून २६ फेब्रुवारीला नवी मुंबई मध्ये लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. माळशिरस तालुक्यातील वय वर्षे ९ ते २० वयोगटातील कुमारवयीन मुलींना याचे लसीकरण मोफत करण्यात येणार असल्याचे कॅन्सर पेटंट ऍड असोसिएशन इंडियाच्या संस्थापक डॉ. श्रध्दा जवंजाळ यांनी सांगितले.
न्यूयॉर्क या परदेशी बनावटीची ही अत्याधुनिक लस असून त्याचा कोणताही दुष्परिणाम नसल्याचे डॉ. एम. के. इनामदार यांनी यावेळी सांगितले. गर्भाशयाच्या कॅन्सरचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. परंतु महिला हा रोग लपवून ठेवतात, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होवू नये म्हणून व्हॅक्सिन उपलब्ध झाले आहे आणि ते मोफत मिळत आहे. स्त्रियांना स्तनाचा व गर्भाशयाचा कॅन्सर होवू शकतो. स्तनाच्या कॅंसरचे प्रमाण मोठे आहे. त्यावर अद्याप उपाय नाही पण, गर्भाशयाचा कॅन्सर होवू नये म्हणून पहिला डोस, दुसरा एक महिन्यानंतर व तिसरा सहा महिन्यानंतर घ्यावा. १८ वर्षाखालील मुलींना पालकांचे संम्मती पत्र आवश्यक असून पालकांनी आपल्या मुलींना ही प्रतिबंधात्मक लस द्यावी असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मानसी देवडीकर यांनी सांगितले. यावेळी सहारा नर्सिंग इंस्टीट्यूटचे अध्यक्ष डॉ. राहूल जवंजाळ उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng