गावाची सेवा, अहोरात्र कष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सत्ता नसताना कुटुंबासह दिवाळी केली गोड

सत्ता असताना कोणीही करीत असते, मात्र सत्ता नसताना सहकार्य करणारे आबांसारखी कमी असतात…

मांडवे ( बारामती झटका )

मांडवे ता. माळशिरस गावचे सर्वसामान्य जनतेची सेवा करणारे माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व मांडवे गावचे माजी सरपंच तानाजीराव पालवे पाटील उर्फ आबांचा ग्रामपंचायतीची सत्ता असताना कर्मचाऱ्यांसाठी दीपावलीनिमित्त सहकुटुंब कपडे घेण्याचा उपक्रम गेली दहा वर्षापासून सुरू आहे‌. गेल्या काही महिन्यात सत्ताबदल झाली मात्र, आबांनी आपल्या उपक्रमात बदल केला नाही. आबांच्या स्तुत्य उपक्रमाचे कर्मचाऱ्यांना कौतुक वाटत आहे.
मांडवे ग्रामपंचायतची गेल्या दहा वर्षापासून आबांच्या गटाकडे सत्ता होती. गावाची सेवा अहोरात्र कष्ट करणारे ग्रामसेवक, कॅम्प्युटर ऑपरेटर, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, साफसफाई, अशी कामे करणारे कर्मचारी कधीही वेळेचा विचार न करता गावाची सेवा करीत असतात. अशा कर्मचाऱ्यांचा दीपावलीनिमित्त सहकुटुंब पोशाख घेण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केलेला होता. गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही गटाचे आठ आठ सदस्य निवडून आले होते. एका जागेसाठी दोन्ही उमेदवारांना समान मते पडलेली होती. चिठ्ठीद्वारे विरोधी गटाची चिठ्ठी निघाल्याने सत्ता बदल होऊन ग्रामपंचायतवर आबांच्या गटाची सत्ता नाही. समाजामध्ये आपण पाहतो, सत्ता असताना अनेकजण कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करीत असतील. मात्र, सत्ता नसताना स्तुत्य उपक्रम सुरू ठेवून सहकार्य करणारे तानाजीराव पालवे पाटील उर्फ आबा यांच्यासारखी कमी माणसे असतात.

तानाजीराव पालवे पाटील यांची परिस्थिती सर्वसाधारण आहे मात्र, त्यांच्या मनाची मोठी श्रीमंती आहे. समाजामध्ये वावरत असताना अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत करण्याची भावना असते. आबांचा सुसंस्कृत स्वभाव, स्वच्छ विचार सरणी, कष्टातून प्रगतीकडे वाटचाल, धार्मिक वृत्ती, अडचणीतील लोकांना मदत, एकच ध्यास गावचा विकास, नेत्यांविषयी प्रेम, एकनिष्ठपणा जनतेविषयी आदर, गावातील वाद विवादात योग्य निर्णय, वडीलधारी मंडळींचा आदर सन्मान, समवयस्कांना बरोबर घेऊन चालणारे कृतिशील युगातील गतिशील नेतृत्व असणारे आबा यांना मांडवे पंचक्रोशीतील जनतेने कमी वयामध्ये जनतेची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. आजपर्यंत आबांनी जनहिताची कामे करून समाजामध्ये आपली वेगळी प्रतिष्ठा निर्माण केलेली आहे. सत्ता नसताना कर्मचाऱ्यांचा दिवाळीनिमित्त स्तुत्य उपक्रम सुरू ठेवलेला असल्याने सत्ताधाऱ्यांनी आदर्श घ्यावा असे आदर्शवत कार्य केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article२४व्या ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत ब्राँझ पदक मिळवले बद्धल पै. तेजस गायकवाड यांचा सत्कार
Next articleसोलापूर जिल्ह्यात शेतकरी नाहीत का ? धैर्यशील मोहिते पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here