सोलापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील व तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न..
सोलापूर ( बारामती झटका )
आगामी नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका तोंडावर आलेल्या आहेत. प्रत्येक गावातील वार्डात व शहरातील प्रभाग रचनेत बुथ कमिट्या सक्षम करून निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सोलापूर येथील जिल्ह्याचे पदाधिकारी व तालुक्यातील विविध सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्या आढावा बैठकीवेळी उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना आगामी काळातील निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे संकेत दिले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य भाजपचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस के.के. पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, ओबीसीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, माळशिरस तालुका युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष व मोटेवाडीचे सरपंच दादासाहेब खरात, भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष व डोंबाळवाडीचे सरपंच पिंटू माने आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी काळामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. प्रत्येकाने आपल्या गावात वार्ड रचना व शहरात प्रभाग रचना या प्रमाणे बुथ कमिट्या यांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी माळशिरस तालुक्यातील बूथ कमिट्या यांची बांधणी व्यवस्थित केलेली असल्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी समाधान व्यक्त करून कार्यकर्त्यांना निवडणुकीत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng