गिरझणी येथील प्रगतशील बागायतदार साहेबराव बापू वाघ यांचे प्रथम पुण्यस्मरण संपन्न.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, फत्तेसिंह माने पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह माने पाटील परिवारातील अनेक मान्यवरांची उपस्थिती.

अकलूज ( बारामती झटका )

गिरझणी ता. माळशिरस येथील नेते अभिजीत वाघ यांचे आजोबा प्रगतशील बागायतदार स्व‌ साहेबराव बापु वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरण प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माजी खासदार श्री. विजयसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. मदनसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. फत्तेसिंह माने पाटील, श्री. दीपकराव माने पाटील, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, श्री. हिंदूराव माने पाटील, श्री. रामराव माने पाटील, श्री. काकासाहेब माने पाटील, डॉ. पृथ्वीराज माने पाटील, श्री. श्रीराज (भैया) माने पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली.

गिरझणी पंचक्रोशीतील राजकारणासह सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. समस्त वाघ परिवार गिरझणी यांच्यावर प्रेम करणारी मित्र परिवार व नातेवाईक उपस्थित होते.

अकलूज पंचक्रोशीमध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, कर्मवीर बाबासाहेब माने पाटील, धर्मवीर सदाशिवराव माने पाटील या त्रिमूर्तींसह ज्येष्ठ नेते व्यंकटराव माने पाटील या सर्वांनी परिसरातील सर्व जाती धर्मातील, गोरगरीब, श्रीमंत यांच्या सुख दुःखामध्ये नेहमीच सहभाग नोंदविलेला आहे‌. त्यांचेच वारसदार देखील सर्वांच्या सुख दुःखामध्ये नेहमी सहभागी असतात.

राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवून सर्व वारसदारांची परंपरा पुढे नेणारे नेते राजकारणात जरी वेगवेगळे प्रवाह असतील तरीसुद्धा वाघ यांच्या कार्यक्रमात एकाच ठिकाणी एकत्र आलेले असल्याने उपस्थित लोकांना दुःखाच्या प्रसंगीसुद्धा सुखद क्षण अनुभवायला मिळाला आहे. स्वर्गीय साहेबराव बापू वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त योगायोगाने मोहिते पाटील व माने पाटील परिवार एकत्र पाहावयास मिळालेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleBest 4 Payday Loans And FirstPennHomeMortgage Bad Credit Loans In July 2022
Next articleहॉटेल राजधानी म्हणजे अस्सल गावराण जेवणासाठी प्रसिध्द असलेले हॉटेल….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here