गिरवी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी धुळा शंकर खरात यांचा दैदिप्यमान विजय.

व्हाईस चेअरमनपदी रामा किसन पांढरे यांची बिनविरोध निवड.

गिरवी ( बारामती झटका )

गिरवी ता. माळशिरस येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित गिरवी या सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीची बैठक ग्रामपंचायत कार्यालय येथे दि. 03/04/2022 रोजी सकाळी 11 वाजता श्री. एस. एम. कांबळे अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडीमध्ये धुळा शंकर खरात यांनी अटीतटीच्या लढतीत एक मताने दैदिप्यमान विजय संपादन केलेला आहे. तर व्हाईस चेअरमन पदी एकमेव अर्ज रामा किसन पांढरे यांचा आलेला असल्याने त्यांना बिनविरोध घोषित करण्यात आले.

माळशिरस तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकलूज ता. माळशिरस यांच्या कार्यालयाकडील आदेशाप्रमाणे गिरवी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक श्री. ए. एम. कांबळे अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नवनिर्वाचित संचालक धनंजय मोरेश्वर कुलकर्णी, पोपट निवृत्ती काळे, नवनाथ गोविंद पालवे, पांडुरंग मारुती गोफणे, धुळा शंकर खरात, प्रफुल्ल रंगनाथ कुलकर्णी, सुखदेव ज्ञानू कपने, रामा किसन पांढरे, शरद गेना सावंत, श्रीमती तोलाबाई महादेव बर्वे, सौ. अलका पोपट सरगर, सतीश सिताराम भुजबळ, सुनिल भिमराव कचरे, असे तेरा संचालक उपस्थित होते.

चेअरमन पदासाठी धनंजय मोरेश्वर कुलकर्णी व धुळा शंकर खरात यांचे दोन अर्ज आलेले होते. उमेदवारी अर्ज भरलेल्या वेळेपासून उमेदवारी अर्ज काढण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तेरा सदस्यांची मतदान प्रक्रिया पूर्ण केली. त्यामध्ये धुळा शंकर खरात यांना 7 मते तर धनंजय मोरेश्वर कुलकर्णी यांना 6 मते पडलेली असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चेअरमन पदी धुळा शंकर खरात यांचा विजय झाल्याचे घोषित केले. व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज रामा किसन पांढरे यांचा आलेला असल्याने बिनविरोध व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

गिरवी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीच्या वेळी गिरवीचे माजी सरपंच आण्णा सरगर, भांबचे विद्यमान सरपंच पोपट सरगर, गिरवीचे माजी सरपंच संतोष राऊत, माजी उपसरपंच बाळासाहेब शिंदे, पोपट घोडके, ग्रामपंचायत सदस्य रोहित जाधव, सुभाष सरगर, किसन जाधव, माजी सदस्य बाळासाहेब कचरे, हनुमंत खरात, सत्यवान बर्वे, विठ्ठल खरात, संतोष खरात, दादा खरात, सुरेश खरात, शिवाजी खरात, पिंटू सरगर, पिंटू सिद, विठ्ठल मदने, अक्षय कचरे, नवनाथ सरगर, बालाजी सरगर आदी मान्यवर उपस्थित होते.

चेअरमन पदी धुळा शंकर खरात यांचा दैदिप्यमान विजय व रामा किसन पांढरे यांच्या नावाची घोषणा करताच उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा करीत वाजत गाजत ग्रामदैवतांचे दर्शन घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजयसिंह मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील समर्थक सोसायटीच्या निवडणुकीमध्ये आमने-सामने.
Next articleवेळापूर येथील अर्धनारीनटेश्वर यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी सुखदेव आडत तर उपाध्यक्षपदी उमेश भाकरे आणि लखनतात्या मंडले यांची निवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here