गुरसाळे गावातील शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय पाणी वापर संस्था व पाटबंधारे विभाग नरमला.

बारामती झटकाने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल घेऊन गुरसाळे हद्दीतील 39 फाटा आठ दारे यावरील माती रातोरात गायब…

गुरसाळे ( बारामती झटका )

गुरसाळे ता. माळशिरस हद्दीतील 39 फाटा यावरील आठ दारे या ठिकाणी छत्रपती पाणी वापर संस्थेने बेकायदेशीर माती टाकून शेतकऱ्यांची शेतीला पाण्याची अडचण केलेली होती. सदरची बातमी बारामती झटका वेबपोर्टलवर प्रसिद्ध होताच रातोरात बेकायदेशीर टाकलेली माती गायब झाली. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झालेला आहे. पाणीवापर संस्था व इरिगेशन यांची नमती भूमिका झालेली आहे.

माळशिरस तालुक्यातील गुरसाळे हद्दीतील 39 फाटा यावर आठ दारे या ठिकाणी 60 ते 70 एकर भिजणारे क्षेत्र आहे. सदरचा 8 दारी फाटा छत्रपती पाणी वापर संस्थेच्या अधिपत्याखाली आहे. सदरच्या क्षेत्रावरील शेतकरी यांनी वेळोवेळी पास काढलेले आहेत. मात्र, स्थानिक राजकारण सुरू करून संस्थेतील धनदांडग्यांनी स्वतःची शेती इतरांचे पाणी वापरून सुरू केलेले आहे. बेकायदेशीर सर्वसामान्य व गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्याय सुरू केलेला आहे. पाणी वापर संस्था होत आहे म्हटल्यावर, संबंधित 39 फाट्यावरील आठ दारे येथील शेतकरी सदरच्या संस्थेमध्ये सहभागी झालेले होते. संस्था अस्तित्वात आल्यापासून संस्थेचे कार्यालय गुरसाळे गावात अस्तित्वात नाही. चेअरमन, सचिव यांची भेट घेणे मुश्किल असते. शेतकऱ्यांनी पास व इतर कामासाठी कोठे भेटायचे, असा प्रश्न निर्माण झालेला असतो. पास टाकण्याची मुदत संपून गेल्यानंतर संबंधित छत्रपती पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी शेतकऱ्यांना आपण पास टाकला नाही म्हणून पाणी मिळणार नाही असे सांगून आठ दारे या ठिकाणी 39 फाट्याला माती टाकून बुजवून टाकलेला होता. सदर ठिकाणी अनिल दत्तात्रय कोरडकर, रामचंद्र लहुजी झेंडे, समीर प्रकाश झेंडे, भारत विठ्ठल झेंडे व इतर शेतकरी उपस्थित होते. छत्रपती पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पूर्वकल्पना न देता सदरच्या दारावर माती टाकून बंद केलेले आहे. जलसंपदा विभाग अधिकारी व पाणी वापर संस्था यांची मिलीभगत आहे. धनदांडग्या शेतकऱ्यांकडून आर्थिक हितसंबंध असल्याने गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय सुरू असल्याचे रामचंद्र लहुजी झेंडे यांनी सांगितले. जर जलसंपदा विभाग आणि पाणी वापर संस्था यांनी दोन दिवसात आठ दारावर टाकलेली बेकायदेशीर माती नाही काढली तर आम्ही बायका-मुलांसह आत्मदहन करणार असल्याचे पीडित शेतकरी यांनी सांगितले होते.

पिडीत शेतकऱ्यांचा प्रश्न समाज माध्यमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग व पाणी वापर संस्थेच्या पदाधिकारी यांच्या कानापर्यंत गेल्यानंतर कोणाची कान उघडणे झाली माहित नाही. मात्र, बेकायदेशीर टाकलेली माती रातोरात गायब झालेली आहे. जलसंपदा विभागाशी संपर्क साधला असता त्यांचेकडून पाणी वापर संस्था झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी पाणीवापर संस्थेची येत असते, अशी माहिती मिळाल्यानंतर आठ दारे येतील शेतकरी यांनी छत्रपती पाणीवापर संस्थेमध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा नाही, असे सर्व शेतकऱ्यांच्या बोलण्यातून येत होते. यावेळी अनिल दत्तात्रय कोरडकर, रामचंद्र लहुजी झेंडे, समीर प्रकाश झेंडे, भारत विठ्ठल झेंडे, शिवलिंग कृष्णा झेंडे, दिलीप संभाजी झेंडे, महावीर विठोबा झेंडे, बबन संतू माळी, बाळासो साहेबराव जगताप, संतोष जालिंदर चव्हाण, बंडू भानुदास गायकवाड, शंकर संतू माळी आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

सदरच्या ठिकाणी माती काढल्यानंतर फाट्यावरील दार जेसीबीच्या साह्याने ठोकलेले होते. वेडेवाकडे केलेले असल्याने सदरच्या दारातून पाणी शेतकऱ्यांच्या रानात जात नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्थेतून बाहेर निघून थेट जलसंपदा विभागाशी संबंध साधून रीतसर पास काढून आपल्या शेतीला पाणी पुरवठा करण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे. लवकरच इरिगेशनचे उपअभियंता, शाखा अभियंता, छत्रपती पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी व आठ दारे या ठिकाणावर भिजणारे सर्व शेतकऱ्यांची बैठक होऊन पुढील निर्णय होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत कॅन्सर निदान व उपचार शिबिराचे आयोजन
Next articleकारुंडे गावच्या उपसरपंचपदी सौ. बायडाबाई रघुनाथ रुपनवर यांची नाट्यमयरित्या निवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here