गुरसाळे गावातील दगडीखान ते पालखीपार रस्ता माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग उप अभियंता यांनी दहा दिवसांची मुदत मागितली.
दहा दिवसात दगडी खान ते पालखी पार रस्ता पूर्व व्रत न झाल्यास पुन्हा बहुसंख्येने आत्मदहन करणार.
गुरसाळे ( बारामती झटका )
गुरसाळे तालुका माळशिरस येथील ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले तहसील कार्यालय, पंचायत समितीमधील जिल्हा परिषद बांधकाम विभाग, शेती महामंडळ अशा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट दिल्यानंतर गुरसाळे येथील दगडी खान ते पालखीपार रस्ता याच्या मध्यभागी श्री संतोष माणिक पाटील यांनी रस्त्याच्या मध्यभागी नारळाचे झाड लावून वाहतुकीस अडथळा केल्याचे दिसून आले सदरचा रस्ता रोजगार हमी योजने मधून कधी झाला कोणत्या जमिनीच्या हद्दी मधून झाला याची शहानिशा करण्यासाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व शेती महामंडळ यांचेकडून सर्व माहिती घेण्यासाठी अवधी लागेल तरी आपण सर्वांनी सदर रस्त्याची संपूर्ण माहिती जमा करण्यासाठी सुट्टीचे दिवस सोडून आज दिनांक 15/ 1/20 22 रोजी पासून अंदाजे दहा दिवस आपले सामूहिक आत्मदहन करण्याचे आंदोलन स्थगित करावे व आम्हास सहकार्य करावे असे पत्र जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता श्री अशोकराव रणवरे यांच्या सहीने नायब तहसीलदार सानप साहेब यांच्या हस्ते देण्यात आले त्यावेळी मंडलाधिकारी तलाठी ग्रामसेवक शेती महामंडळाचे अधिकारी व उपोषण कर्ते यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आत्मदहन करणारे शेतकरी श्री दत्तात्रय विठोबा शेळके, महादेव विलास मोरे, लहू महादेव मोरे ,राजेंद्र गेना गाढवे, रामचंद्र मुगुटराव गायकवाड, तुकाराम पंढरीनाथ गायकवाड, युवराज संजय गायकवाड ,विशाल संजय सावंत यांनी तहसीलदार यांना लेखी पत्र दिले सदरच्या पत्रामध्ये सामूहिक आत्मदहन मागे घेत आहे दिनांक 15 /1 /2022 प्रत्यक्ष साईटवर ग्रा.मा. 564 वर दिलेले आम्हास आत्मदहन स्थगिती बाबतचे पत्र मिळाले आपल्या पत्राच्या विनंतीला मान देऊन आम्ही आत्मदहन करणारे आंदोलन करते आमचे आत्मदहन आन्दोलन माघारी घेत आहोत आपल्या पत्रातील ॲग्रीमेण्टप्रमाणे आपण आमचा ग्रा.मा. रोड 564 दहा दिवसात खुला करून देणे तसे न झाल्यास आम्ही आपणावर कोर्टामार्फत कायदेशीर कारवाई करणार आहोत व पुढील चार दिवसात बहुसंख्येने आत्मदहनाच्या तयारीत असणार आहे याची आपणास पोलीस प्रशासन समवेत जाणीव करून देत आहोत या अनुषंगाने उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी पीएसआय ग्रामसेवक पोलीस पाटील तलाठी उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत.
माळशिरस तालुक्याचे गुरसाळे गावातील शेतकऱ्यांच्या आत्मदहनाकडे लक्ष लागलेले होते प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला आहे दहा दिवसानंतर काय निर्णय होतोय याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng