सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते नूतन संचालकांचा सन्मान संपन्न.
अकलूज ( बारामती झटका )
सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांच्या शुभहस्ते गुरसाळे विकास सोसायटीच्या निवडणुकीत दैदिप्यमान विजय मिळवून मोहिते पाटील गटाची एकहाती सत्ता आलेल्या नुतन संचालकांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारप्रसंगी नुतन संचालक अनिल भोईटे, गोरख चव्हाण, शेळके साहेब, आप्पासो गायकवाड, गजानन जेडगे, पांडुरंग पवार, मुकेश माळी, कांतीलाल रायते, भावी चेअरमन गुलाबराव गायकवाड, राजेंद्र गायकवाड, सचिन चव्हाण यांच्याबरोबर श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजयाचे चाणक्य किंगमेकर संजय कोरटकर, रमेश कोरटकर, सोमनाथ चव्हाण व दत्ताबुवा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng