श्री दक्षिण मुखी काळभैरवनाथ शेतकरी पॅनलचे विद्यमान चेअरमन श्रीकांत नानासो मोरे यांच्यासह सर्व उमेदवारांचा धुरळा उडुन पॅनलचा सुपडासाफ…
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय कोरटकर ठरले किंगमेकर.
गुरसाळे ( बारामती झटका)
गुरसाळे ता. माळशिरस येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या सर्वच्या सर्व तेरा जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर दक्षिण मुखी काळभैरवनाथ शेतकरी पॅनलच्या विद्यमान चेअरमन श्रीकांत नानासो मोरे यांच्यासह सर्व सदस्यांचा धुरळा उडवून पॅनलचा मतदारांनी सुपडा साफ केलेला आहे.
गुरसाळे विविध कार्यकारी सेवा सोसायटीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात 8/9/1936 साली झालेली आहे. सोसायटीचे 815 सभासद आहेत एक कोटी रुपयाच्या आसपास वाटप केले जाते. गेल्या तीस वर्षापासून संस्थेची निवडणूक बिनविरोध होत असते. मात्र यंदाच्या वर्षी श्री काळ भैरवनाथ शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे संजय दत्तात्रय कोरटकर, दत्तात्रय विठोबा शेळके, दिपक बबनराव कोरटकर, संजय गोपाळ पाटील, अर्जुन हनुमंत पवार, सोमनाथ चव्हाण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तर श्री दक्षिण मुखी काळभैरवनाथ शेतकरी पॅनल श्रीकांत नानासो मोरे, भीमदेव तुकाराम पवार, राजाराम पंढरीनाथ गवळी, मोहन मारुती घाडगे, गणेश खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक झालेली होती. निवडणुकीसाठी 427 सभासद मतदार मतदानासाठी पात्र होते. पैकी 391 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटात बागल दिलीप पांडुरंग 116, भोईटे अनिल सदाशिव 239, चव्हाण गोरख भानुदास 256, गायकवाड आनंदराव मुरलीधर 115, गायकवाड आप्पासो मनोहर 258, गायकवाड गुलाब मारुती 263, घाडगे लक्ष्मण मारुती 126, जेडगे गजानन बाबू 240, कोरटकर दीपक बबनराव 252, माने भालचंद्र गणपत 122, मोरे श्रीकांत नानासो 130, मोरे विजय बाबु 112, नवले सतीश शामराव 117, पवार पांडुरंग बाजीराव 255, पवार युवराज भिमराव 111, रायते कांतीलाल निवृत्ती 243 असे 16 उमेदवार उभे होते.
महिला प्रतिनिधी गटात गायकवाड द्वारका अर्जुन 261, जोशी सुभद्रा कृष्णा 109, मोरे सुभद्रा लालासो 126, शेळके शांताबाई विठोबा 254, तर भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटात चव्हाण मंगल लाला 270, दडस गणपत भिकु 114, अनूसुचित जाती जमाती गटात खिलारे बबन गुलाब 121, झेंडे पोपट नामदेव 262, इतर मागासप्रवर्ग गटात
माळी दत्तू संतु 118, माळी मुकेश दत्तू 268, पितापुत्राच्या झालेल्या लढतीत पुत्र विजयी झालेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng