बाळदादा तुम्हीच सांगा संचालकांचा सत्कार करून राष्ट्रवादीचा व्हाईस चेअरमन झालाच कसा ? सभासदांचा सवाल.
गुरसाळे ( बारामती झटका )
गुरसाळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गुरसाळे संस्थेवर मोहिते पाटलांची सत्ता अबाधित भाजपचे गुलाब मारुती गायकवाड चेअरमन तर राष्ट्रवादीचे दिपक बबनराव कोरडकर विरोधक सत्तेत वाटेकरी झालेले असल्याने माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांनी निर्वाचित ११ संचालकांचा सत्कार केलेला होता. २ सदस्य अनुपस्थित होते. संख्याबळ भाजपचे असताना राष्ट्रवादीचा व्हाईस चेअरमन झालेला असल्याने बाळदादा तुम्हीच सांगा ११ संचालकांचा सत्कार करून राष्ट्रवादीचा व्हाईस चेअरमन झालाच कसा ? असा सभासदांमधून सवाल उपस्थित होत आहे.
२५ वर्षानंतर चेअरमन बदल दि. ०१/०५/२०२२ रोजी झालेल्या निवडणुकीत पाटील कोरटकर गटाच्या एकोप्याने निर्माण झालेल्या श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास परिवर्तन पॅनल त्यांनी सत्ताधारी पॅनलचा १३-० ने धुव्वा उडवून २५ वर्षानंतर स्थानिक सत्तापालट आज दि. १३/०५/२०२२ रोजी झालेल्या पदाधिकारी निवडीत चेअरमन म्हणून भाजपचे श्री गुलाब मारुती गायकवाड व्हाईस चेअरमन म्हणून राष्ट्रवादीचे श्री. दिपक बबनराव कोरटकर यांची एकमताने बिनविरोध निवड झाली.

सदर निवड प्रक्रियेत सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून श्री. डी. पी. राऊत, ए. एच. बोथिकर, श्री. भिमदेव बनसोडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
यावेळी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री. सोमनाथ चव्हाण पाटील, श्री. शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. संजय कोरटकर ,माजी संचालक श्री. बाळकृष्ण पाटील, उद्योगपती दत्तात्रय विठोबा शेळके, यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी नूतन चेअरमन गुलाब गायकवाड व नूतन व्हाईस चेअरमन दीपक कोरटकर यांच्याबरोबर नूतन संचालक गोरख भानुदास चव्हाण, पांडुरंग पवार, आप्पासो गायकवाड, अनिल भोईटे, गजानन जेडगे, कांतीलाल रायते, महिला प्रतिनिधी द्वारका अर्जुन गायकवाड, शांताबाई विठोबा शेळके, अनुसूचित जाती प्रतिनिधी पोपट झेंडे इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मंगल लालासो चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
एकदिलाने काम करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे आश्वासन नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी दिले. संस्थेचे ऑफिस मध्यवर्ती ठिकाणी गावात आणण्याचे निवडणुकीत दिलेले पहिले आश्वासन नवीन संचालक मंडळाने पूर्ण केले.
तसेच नूतन संचालक मंडळांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष करण्याची ग्वाही दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पवार, गणेश काटे, तंटामुक्ती अध्यक्ष सोमनाथ लाला चव्हाण, माजी सरपंच विजय जेडगे, राजू गायकवाड, पिंटू जेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng