आमदार गोपीचंद पडळकरांना कोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला, कधीही अटक होण्याची शक्यता

आटपाडी (बारामती झटका)

आमदार पडळकर यांच्यावर खुनी हल्ल्याचा, तर माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांच्यावरही बेकायदा जमाव जमवल्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सांगलीच्या आटपाडी राडा प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना सेशन कोर्टाने (Sessions Court) मोठा झटका दिला आहे. कोर्टाने पडळकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. सेशन कोर्टाचे न्यायाधीश आर. व्ही. जगताप यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने पडळकरांचा जामीन अर्ज फेटाळला.

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत आटपाडीत दि. 7 नोव्हेंबरला झालेल्या राड्यामुळे तणावाचे वातावरण आहे. आमदारांनी अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजू जानकर यांनी केला. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करीत गाडीची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसात दोन्ही पक्षांकडून परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

आमदार पडळकर यांच्यावर खुनी हल्ल्याचा, तर माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांच्यावरही बेकायदा जमाव जमवल्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडून आटपाडी तालुक्यात छापेमारी करण्यात आली.

पोलिसांकडून चार अलिशान गाड्या जप्त

पोलिसांनी आमदार पडळकर, तानाजी पाटील, राष्ट्रवादीचे राजू जानकर यांची अलिशान चार वाहने जप्त केली. त्यानंतर आमदार पडळकर आणि तानाजी पाटील यांनी अटक पूर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेतली. त्यावर आज सुनावणी झाली असून तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे कोणत्याही क्षणी दोघांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना राबविण्याचा निर्णय
Next articleबारामती तहसील कार्यालयात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना प्रशासनातर्फे अभिवादन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here