गोरडवाडीकर कायम लोकप्रिय आ. राम सातपुते यांच्या पाठीशी ठाम राहणार – लक्ष्मणतात्या गोरड.

मौजे गोरडवाडी बिरोबा मंदिर ते दशरथ गोरड वस्ती, लक्ष्मी मंदिर शेत ते मेन कॅनॉल रस्त्यासाठी 24 लाख रुपये मंजूर झाले

गोरडवाडी (बारामती झटका)

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेतून कोट्यावधी रुपये माळशिरस तालुक्यातील रस्त्यांसाठी मंजूर केलेले आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा मौजे गोरडवाडी बिरोबा मंदिर ते दशरथ गोरड वस्ती, लक्ष्मी मंदिर शेत ते मेन कॅनल रस्त्यासाठी 24 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. गोरडवाडीकरांची अनेक दिवसांची अडचण लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी सोडवलेली असल्याने गोरडवाडीकर कायम लोकप्रिय आ. राम सातपुते यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे मत गोरडवाडीचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते लक्ष्मणतात्या गोरड यांनी सांगितले.

रयत क्रांती शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मणतात्या गोरड यांनी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले होते. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे निवडून आल्यानंतर निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम सुरू आहे. लक्ष्मणतात्या गोरड यांनी लोकप्रिय आ. राम सातपुते यांच्याकडे रस्त्याची अडचण सांगितलेली होती. युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड यांनीही पाठपुरावा आमदार यांच्याकडे सुरू ठेवलेला होता. ग्रामदैवत बिरोबा मंदिर व माळशिरस म्हसवड रस्त्यावर येण्यासाठी पावसाळ्यामध्ये लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. अनेक दिवसांच्या प्रलंबित रस्त्याला पाणंद योजनेतून 24 लाख रुपयांचा निधी मिळालेला असल्याने गोरडवाडीकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकेंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाला बजेटमध्ये निधीची तरतूद केली
Next articleभाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर महत्त्वाच्या पदापासून वंचित, संधी मिळणार का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here