भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या साधेपणावर बिरोबा भक्त भारावले.
गोरडवाडी ( बारामती झटका )
गोरडवाडी ता. माळशिरस येथील ग्रामदैवत श्री बिरोबा देवाची यात्रा गेली दोन दिवस उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात सुरू आहे. ग्रामदैवत बिरोबा देवाचे दर्शन भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी बिरोबा देवाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी माळशिरस तालुका रयत क्रांती शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गोरडवाडीचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच लक्ष्मण तात्या गोरड यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री बिरोबा यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते लक्ष्मणतात्या गोरड यांनी श्री बिरोबा देवासाठी सभामंडपाची मागणी केलेली होती. सात लाख रुपये सभामंडपासाठी आमदार राम सातपुते यांनी दिले होते. श्री बिरोबा देवस्थान समस्त गोरडवाडी व पंचक्रोशीतील लोकांचे श्रद्धास्थान आहे. यात्रेच्या कालावधीमध्ये अनेक कार्यक्रम घेतले जातात. भव्य जंगीकुस्त्याचे मैदान, गजी ढोल, क्रिकेट स्पर्धा असे कार्यक्रम घेतले जातात. आलेले सर्व भाविक भक्त श्री बिरोबा मंदिराच्या ठिकाणी शाकाहारी व मांसाहारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी गजी खेळणाऱ्या लोकांच्या समवेत श्री बिरोबा देवाच्या महाप्रसादाचे सेवन करण्याकरता अत्यंत साधेपणाने कोणताही डामडौल न करता जमिनीवर घोंगडे अंथरूण महाप्रसादाचा आस्वाद घेतलेला असल्याने लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या साधेपणावर बिरोबा भक्त भारावले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
