गोरडवाडी ( बारामती झटका )
गोरडवाडी ग्रामपंचायतचे युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याबद्दल माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैया सुळ पाटील मित्र मंडळाच्यावतीने त्यांचा गोरडवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सन्मान करण्यात आला. यावेळी माजी उपसभापती किशोरभैया सुळ पाटील यांनी युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड यांना स्वत: हाताने फेटा बांधून त्यांचा सन्मान केला.
यावेळी सचिन रुपनवर, सुनील पाटील, निलेश रुपनवर, महेश थिटे, राहुल सुळ आदी मित्रपरिवार उपस्थित होता. तर गोरडवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच रामचंद्र गोरड, युवानेते मच्छिंद्र गोरड सर, उपसरपंच दिपक गोरड, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पिसे, गोरडवाडी सोसायटीचे माजी चेअरमन संतोष गोरड, बाळासाहेब गोरड, विजय गोरड, भारत गोरड, भारत सरगर, संभाजी गोरड, आजीनाथ गोरड, नवनाथ गोरड, धुळा गोरड, आबासाहेब गोरड, सलीम मुलाणी, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर एजाज पठाण, पत्रकार संजय हुलगे, छायाचित्रकार शशिकांत म्हमाणे आदी मान्यवरांसह गावातील प्रमुख व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
माजी उपसभापती किशोरभैया सूळ पाटील आणि नवनियुक्त युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड यांना उपस्थित ग्रामस्थांनी एकाच हारामध्ये घेऊन गोरडवाडीकरांनी किशोरभैया यांचा सुद्धा माळशिरस पंचायत समिती मधील दैदिप्यमान कारकिर्दीसाठी सन्मान केला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng