गोरडवाडी ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विष्णू गोरड यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती अध्यासी अधिकारी संदिप चव्हाण यांनी दिली. आधीच्या सरपंच बायडाबाई गोरड यांनी राजीनामा दिल्यामुळे गोरडवाडी ग्रामपंचायतचे सरपंच पद हे रिक्त होते. त्यासाठी निवडणुक निर्णायक अधिकारी यांनी आज विशेष सभेचे आयोजन केले होते. यामध्ये सरपंच पदासाठी विष्णू गोरड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली. निवडीच्या वेळी अध्यासी अधिकारी संदिप चव्हाण, सहाय्यक म्हणून तलाठी दिग्वीजय शहा, ग्रामसेवक रविंद्र पवार यांनी काम पाहिले.
गोरडवाडी गावातील गोरड व हुलगे या दोन्हीही गटाचे पाच वर्षाचे सरपंच पदाच्या कालावधीचे नियोजन ठरलेले आहे. त्याप्रमाणे सरपंच बायडाबाई गोरड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सरपंच पदाची निवडणूक दि. २४/०९/२०२१ रोजी सकाळी १० ते १२ नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, १२ ते १ नामनिर्देशन पत्राची छाननी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ दुपारी १ ते २ होती. यावेळीस सरपंच पदासाठी विष्णू गोरड यांचा एकमेव अर्ज आल्याने दुपारी २ वाजता विष्णू गोरड यांना सरपंच म्हणून अध्यासी अधिकारी यांनी घोषीत केले.
गोरडवाडी ग्रामपंचायतीचे ११ सदस्य
वार्ड क्र. १ बायडाबाई पांडुरंग गोरड, मेघाराणी संदीपान कर्णवर
वार्ड क्र. २ विष्णू नाना गोरड, मैनाबाई दिपक गोरड, जयश्री माणिक कोकरे
वार्ड क्र. ३ विजय निवृत्ती गोरड, ताई शंकर यमगर, ज्योती नवनाथ केंगार
वार्ड क्र. ४ पांडुरंग किसन पिसे, पुनम मच्छिद्र गोरड, मुगाबाई आज्ञान गोरड
गोरडवाडी येथे नेतेमंडळी व पार्टी प्रमुख यांची बैठक होऊन सरपंच पदासाठी चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. त्यामध्ये युवा नेते विष्णूभाऊ गोरड यांची चिट्ठी निघालेली असल्याने गोरडवाडी गावच्या सरपंच पदी युवकाला पहिल्यांदा संधी मिळाली आहे.
तालुक्यातील अनेक दिग्गजांनी लावली हजेरी
यावेळी राजेवाडी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन बाळासाहेब कर्णवर-पाटील, माजी उपसभापती किशोरभैया सुळ पाटील, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, यांनी नुतन सरपंच विष्णू गोरड यांचा सन्मान केला. यावेळी भिकाजी गोरड, नाना हुलगे, बाळासाहेब गोरड, रामचंद्र गोरड, संतोष देशमुख, अमोल कोळेकर, राजु गोरे, राजेंद्र कोळेकर, बापु गोरड, लक्ष्मण गोरड, भागवत कर्णवर-पाटील, अजिनाथ कर्णवर, हनुमंत गोरड, संतोष गोरड, दिपक गोरड, मच्छिंद्र गोरड, इंजिनीअर अजय गोरड, रावसाहेब गोरड, संदिपान कर्णवर, राजेंद्र गोरड, ददासाहेब हुलगे, जगन्नाथ गोरड, आबा गोरड, तायाप्पा गोरड, उत्तम गोरड, पोलीस पाटील नानासाहेब यमगर, नवनाथ केंगार, संजय कोळेकर, अभिनेता बिरा गोरड, गणेशराजे कोकरे, वैभव पुजारी, कैलास यमगर, भारत सरगर आदीसह ग्रामपंचायतीचे कर्मचारी याकुब शिकलगार, आब्दुल शिकलगार आदी मान्यवर उपस्थीत होते. निवड झाल्यानंतर फटाक्यांची आतीषबाजी हलगीचा कडकडाट व गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng